

-rat२४p१७.jpg-
२५N६६०२८
खेड ः जगबुडी पुलावर झालेल्या अपघातानंतर त्याठिकाणी उभी केलेली रिकामी पिंप.
----
‘त्या’ अपघास्थळावर ठोस उपाययोजना करा
वाहनचालकांची मागणी ः सध्या रिकामी पिंपचा आधार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २४ ः मुंबई-गोवा महामार्गावरील नव्या जगबुडी पुलावरून मोटार नदीत कोसळून ६ जणांचा हकनाक बळी गेल्यानंतर त्याकडे राष्ट्रीय महामार्ग विभाग गांर्भीयाने पहात नसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून कुचकामी उपाययोजनांचा अवलंब सुरू आहे. जगबुडी पुलावर झालेल्या अपघातस्थळी उभारलेले गर्डर काही तासातच हटवून तेथे ३ रिकामी पिंप उभी केली आहे. यामुळे ठोस उपाययोजना करण्यासाठी आणखी किती बळी हवेत, असा केला जात आहे.
मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यापासून परशुराम घाटापर्यंत वाहनचालकांचा प्रवास वेगवान झाला असला तरी भोस्ते घाटातील अवघड वळणासह नव्या जगबुडी पुलावरील वळणामुळे अपघाताची मालिका थांबलेली नाही. तीन दिवसांपूर्वी घडलेला अपघात तीन वर्षातील मोठा अपघात होता. या दुर्घटनेनंतरही महामार्ग खात्याने तातडीच्या डागडुजीची तसदी घेतलेली नाही.
भीषण दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याने काही तासातच अपघातस्थळी तीन गर्डर बसवले. ही मलमपट्टी टीकेची धनी बनताच काही तासातच अपघातस्थळावरून गर्डर बाजूला हटवत वळणालगत उभे केले. त्यामुळे अपघातांचा धोका आणखी वाढला आहे. तसेच जगबुडी पुलाच्या अपघाताच्यादृष्टीने संवेदनशील ठिकाणी चक्क तीन रिकामे पिंप उभे करत केवळ वेळ मारून नेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.