महावितरणकडून नियंत्रण कक्षाची स्थापना

महावितरणकडून नियंत्रण कक्षाची स्थापना
Published on

महावितरणकडून नियंत्रण कक्ष स्थापन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. यामुळे वीजपुरवठ्यात अडथळे येत आहेत. वीजपुरवठ्याबाबत वेळेत व अचूक माहिती मिळावी म्हणून महावितरणने रत्नागिरी येथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.
पावसामुळे महावितरणचे पोल पडणे, वीजवाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडून वीजपुरवठा खंडित होत आहे. जिल्ह्यातील वीजग्राहक आपत्कालीन कक्षाच्या ७८७५७६५०१८ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. ग्राहकसेवेत हा क्रमांक चोवीस तास सुरू असणार आहे. विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी १८००२३३३४३५ व १८००२१२३४३५ तसेच १९१२ अशा तीन टोल फ्री क्रमांकाची सोय महावितरण कंपनीने केली आहे. मध्यवर्ती ग्राहकसेवा केंद्राद्वारे या क्रमांकावर २४ तास सेवा दिली जाते. याशिवाय ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकाला मिस्ड कॉल केल्यानंतरसुद्धा वीजपुरवठा खंडित असल्याची तक्रार नोंदवली जाते किंवा NOPOWER <ग्राहक क्रमांक=""> हा संदेश ९९३०३९९३०३ या नंबरवर पाठवा. या पद्धतीचा वापर केल्यास ग्राहकाची तक्रार योग्य व्यक्तीपर्यंत व वेळेत पोहोचवून त्या वेळेत सोडवण्यास मदत होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com