जिल्ह्यातील अनधिकृत,अनावश्यक होर्डिंग्ज काढा

जिल्ह्यातील अनधिकृत,अनावश्यक होर्डिंग्ज काढा
Published on

जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्ज काढा
पालकमंत्री सामंत ः शहरांचे विद्रुपीकरण थांबवणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : पर्यटनवाढीसाठी त्रासदायक ठरणाऱ्या आणि शहर विद्रुपीकरण करण्यामध्ये मोठा वाटा असलेली अनधिकृत व अनावश्यक होर्डिंग्ज काढण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
पर्यटनवाढीसाठी त्यांनी अनेक पर्यटनस्थळे विकसित केली आहेत व काही विकसित होत आहेत. अनधिकृत व अनावश्यक होर्डिंग्ज ही केवळ शहरच विद्रुप करत नाहीत तर पर्यटक वा शहरातील नागरिकांनादेखील त्रासदायक ठरतात. तसेच अशा होर्डिंग्जमुळे मोठ्या अपघातांचासुद्धा फार मोठा धोका संभवतो. या सर्व बाबींचा विचार करून व भविष्यातील रत्नागिरी जिल्ह्याचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील सर्व ठिकाणची अनधिकृत व अनावश्यक होर्डिंग काढून टाकण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यामध्ये येऊ घातलेल्या उद्योगांच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये पर्यटकदेखील मोठ्या संख्येने येणार असल्याने पालकमंत्री पर्यटनाच्या बाबतीतदेखील महत्त्वपूर्ण निर्णय घेताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com