चिपळूण ः कोयना धरणातील पाणीपातळीत वाढ

चिपळूण ः कोयना धरणातील पाणीपातळीत वाढ
Published on

कोयना धरणातील पाणी पातळीत वाढ

२४ तासांत ७४ मिलिमीटर पावसाची नोंद

चिपळूण, ता. २४ ः कोयना धरण परिसरात गेल्या २४ तासांत ७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना, महाबळेश्वर, नवजा या परिसरांत पावसाचा जोर वाढत असून, गडद ढगांची सततची उपस्थिती आणि विजांच्या कडकडाटासह सरी चालू आहेत. त्यामुळे कोयना धरणाच्या साठ्यात वाढ होऊन सध्या १९.५४ टीएमसी पाणीसाठा नोंदवला गेला आहे.
काही दिवसांपूर्वी धरणातील पाण्याची पातळी १४ टीएमसी आली होती. त्यामुळे कोयना प्रकल्पाच्या अलोरे येथीळ चौथ्या टप्प्यातून होणाऱ्या वीज निर्मितीवर मर्यादा आली होती; मात्र धरणात सध्या वेगाने पाणीसाठा वाढत आहे. राज्यातील विजेची वाढलेली मागणीही कमी झाली आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, कोयना खोऱ्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे कुंभार्ली घाटात धुके निर्माण झाले असून, वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याची सूचना अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्याकडून करण्यात आली आहे. कोयना धरण प्रशासन, महानिर्मिती कंपनीकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणातील पाण्याची पातळी ६२९.६४१ मीटर आहे. कोयना धरण वीज पायथा गृहातून सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी सध्या बंद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com