

वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी आकाशवाणी केंद्राजवळील लॉजमध्ये पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी मुली ने-आण करण्यासाठी मदत करणाऱ्या आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
देहविक्रीचा प्रकार काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी उघड केला होता. बनावट गिऱ्हाईक पाठवून या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. यामध्ये मुंबईच्या दोन व गुजरातच्या दोन अशा चार पिडितांची सुटका करण्यात आली होती. मुली पुरवणाऱ्या एजंटासह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली. यातील मुख्य सूत्रधार खान पसार आहे. पोलिसांनी काल कांबळे आणि खडपे असा आणखी दोघा संशयितांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक यादव करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.