मोटार ७० फूट दरीत कोसळून एक महिला जखमी

मोटार ७० फूट दरीत कोसळून एक महिला जखमी
Published on

-rat२४p१९.jpg -
२५N६६०४०
लांजा ः वाकेड घाटात दरीत कोसळलेली मोटार.
---

मोटार दरीत कोसळून महिला जखमी
वाकेड घाटात दुर्घटना ; चार प्रवासी बचावले
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २४ ः मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने मोटार वाकेड घाटात ७० फूट दरीत कोसळली. हा अपघात शनिवारी (ता. २४) सकाळी झाला. या अपघातात एक महिला जखमी झाली असून उर्वरित चार प्रवासी बचावले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार स्वेन मोर्जेलो (वय २१, आगाशे, विरार पश्चिम) हा मोटार घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. तालुक्यातील वाकेड घाटात त्याचे नियंत्रण सुटले आणि मोटार ७० फूट दरीत कोसळली. मोटारीत बसलेल्या एका महिलेच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. तसेच क्लाइड डिसोजा (वय ५६, मालवणी मालाड), फ्लाबिया फर्नांडिस (२६, बोरिवली वेस्ट, गोराई), रियोना (वय १८, आर्लेम गोवा) हे प्रवासी बालंबाल बचावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com