

rat25p5.jpg-
66133
अनंत जोशी सुरेश तळवलकर.
----------
रत्नागिरीत तबला, पखवाज, संवादिनी कार्यशाळा
आर्ट सर्कल फाउंडेशन ; तालयोगी तळवलकर, अनंत जोशी मार्गदर्शक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : येथील आर्ट सर्कल फाउंडेशनने तबला, पखवाज आणि संवादिनी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यामध्ये पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि अनंत जोशी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. ही कार्यशाळा १४ व १५ जून रोजी सिद्धिविनायक मंगल कार्यालयात होणार आहे.
रत्नागिरीतल्या कलाकारांना, तपस्वी कलाकारांकडून मार्गदर्शन मिळावं या हेतूने या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्य, गायन आणि वादन या तीनही प्रकारांमध्ये ताल हा आत्मा असतो. तालाचं विशुद्ध ज्ञान हा संगीत सादरीकरणाला वेगळीच उंची आणि दर्जा प्राप्त करून देतो. मैफिलीचा तोल सांभाळणारा हा ताल अंगात मुरावा लागतो, त्यासाठी अपार अविश्रांत रियाज, मेहनत करावी लागते. प्रत्येक कलाकार ही मेहनत घेत असतो. अशा मेहनतीला योग्य दिशा देण्याचं, विचार देण्याचं काम पंडित सुरेश तळवलकर करणार आहेत.
संवादिनी हे संगीतातील सुरेल वाद्य. परंतु साथसंगत आणि एकल अशा दोन्ही प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवायचं असेल तर कलेबरोबरच कौशल्यही आत्मसात करावं लागतं. त्यासाठी संवादिनीची कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. या दोन्ही कलाकारांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा फायदा रत्नागिरीतील कलाकारांनी घ्यावा, असे आवाहन आर्ट सर्कल फाउंडेशनने केले आहे.
कार्यशाळेची सुरवात १४ जून रोजी दुपारी ३ वाजता होईल. १४ जूनला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कार्यशाळा होणार आहे. संवादिनी कार्यशाळेसाठी चैतन्य पटवर्धन व तबला, पखवाजसाठी हेरंब जोगळेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आर्ट सर्कल फाउंडेशनने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.