चिपळूण-राजकीय पदाधिकारी धडकले महामार्ग विभाग कार्यालयावर

चिपळूण-राजकीय पदाधिकारी धडकले महामार्ग विभाग कार्यालयावर
Published on

rat22p16.jpg -
N66165
चिपळूण : राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करताना राजकीय पदाधिकारी व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी.
----------

राजकीय पदाधिकारी धडकले
महामार्ग विभाग कार्यालयावर
चौपदरीकरणामुळे विविध समस्या ; चिपळुणात वाहतूक व्यवस्थेत अडचणी
चिपळूण, ता. २५ ः गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शहराच्या हद्दीत विविध समस्यांना सामोरे जावे लात आहे. त्यामुळे येथील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक देत जाब विचारला. आठ दिवसात महामार्गालगतची गटारे साफ करावीत तसेच पॉवरहाऊस व गुहागर बायपास येथे गतिरोधक टाकावेत अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा दिला.
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर पाग पॉवरहाऊस आणि गुहागर बायपासजवळ सातत्याने अपघात होत आहेत. पॉवरहाऊस येथे तर अद्याप सिग्नल यंत्रणा बसवलेली नाही. परिणामी, येथे नियमितपणे अपघातांची मालिका सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेत अपघातग्रस्त ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभागास याबाबतच्या सूचना दिल्या होत्या; मात्र अद्यापही त्यावर हालचाली झालेल्या नाहीत. महामार्गालगतची गटारे अनेक ठिकाणी फुटलेली आहेत तसेच ही गटारे दगडमातीने बुजून गेल्याने त्यातून पाण्याचा अपेक्षित निचरा होत नाही. महामार्गावर रात्रीच्यावेळी पुरेसा वीजपुरवठादेखील केला जात नसल्याने पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागावर धडक देत त्याचा जाब विचारला. शाखा अभियंता श्याम खुणेकर यांच्याशी या पदाधिकाऱ्यांनी चर्चाही केली. त्यानुसार पाऊस कमी होताच गतिरोधक टाकण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले तसेच गटारे सफाईलाही त्वरित सुरवात करणार असल्याचे सांगितले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते बापू काणे, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, उमेश सकपाळ, रामदास राणे, स्वानंद रानडे, विनोद बोभसकर, सुयोग चव्हाण, संजय तांबडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune-Bengaluru Highway Set for Transformation with New Flyovers and Bypass Projects
अक्कलकोट देशाच्या सेंट्रलमध्ये येणार असून सोलापूर जिल्हा लॉजिस्टिक हब होणार  :केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, अक्कलकोट येथे २७८४ कोटीच्या पाच कामाचे भूमिपूजन संपन्न
अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यात २७८४ कोटींच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे १४ मे रोजी भूमिपूजन, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन; अनेक मान्यवरांची उपस्थिती
Vidarbha News
Marathi News Esakal
www.esakal.com