भीषण अपघातानंतरही ठेकेदार, अधिकाऱ्यांची पाठ

भीषण अपघातानंतरही ठेकेदार, अधिकाऱ्यांची पाठ

Published on

तुरळ येथील अपघात ...लोगो

अपघातानंतरही ठेकेदार, अधिकाऱ्यांची पाठ
संतोष थेराडे ः जनता रस्त्यावर उतरून धडा शिकवेल
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २६ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे रविवारी संध्याकाळी डंपर आणि खासगी बसमध्ये भीषण अपघात झाला. सुदैवाने, जीवितहानी टळली असली तरी या अपघातामुळे महामार्गावर चार तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या अपघातानंतरही संबंधित ठेकेदार कंपनी व महामार्ग प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. यामुळे स्थानिक जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.
तुरळ परिसरात अपघात हे काही नवीन नाही. वारंवार अपघात होऊनही प्रशासन व ठेकेदार कंपनी सुधारणा करण्यास अपयशी ठरत आहेत. त्यामुळे अपघाताच्या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष थेराडे, राजेंद्र सुर्वे, जितेंद्र चव्हाण, नंदकुमार फडकले, विजय कुवळेकर, अरविंद जाधव, दत्ताराम ओकटे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आणि तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली; मात्र वाहतूककोंडी झालेली असताना ठेकेदार कंपनी किंवा महामार्गाचे अधिकारी फिरकले नसल्याने संताप व्यक्त होत आहे. एका बाजूला अपघात घडत आहेत तर दुसऱ्या बाजूला ठेकेदार कंपनी कोणत्याही प्रकारची पावले उचलत नाहीत. त्यामुळे यापुढे जनता रस्त्यावर उतरून धडा शिकवेल, असा इशारा संतोष थेराडे यांनी दिला आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com