गुणवंत विद्यार्थ्यांना लवकरच विमानाने ‘इस्त्रो’ची सफर
गुणवंत विद्यार्थ्यांना लवकरच
विमानाने ‘इस्त्रो’ची सफर
युवा संदेश प्रतिष्ठानचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.२७ ः येथील युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेतील पंधरा गुणवंतांना ११ जून ते १४ जून २०२५ या कालावधीत विमानाने शैक्षणिक सहल इस्त्रो भेटीसाठी नेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती युवासंदेश प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली.
इस्त्रो सहली दरम्यान भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बंगळुरू, विश्वेश्वरय्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालय, सेंट फिलोमेना चर्च, मैसूर प्राणीसंग्रहालय, मैसूर मत्स्यालय, मैसूर राजवाड, वृंदावन उद्यान, श्री रंगनाथस्वामी मंदिर, इस्कॉन मंदिर यासह दक्षिण भारतातील पर्यटनस्थळांना भेटी देण्यात येणार आहेत.
या सहलीचा प्रारंभ ११ जून सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होणार आहे. युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना संदेश सावंत आणि संस्थापक अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या संकल्पनेतून या सहलीचे आयोजन केले आहे. विमानाने इस्रो सफारीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये चौथी इयत्तेमधील पियुष लाड (नेरुळ), स्वरा गुरव (अजगनी), रेयांश कोळसुलकर (वेंगुर्ले), वृंदा आवडन (आरोंदा), आराध्य आपटे (सावंतवाडी) यांचा समावेश आहे. याशिवाय सहावीतील रुद्र पिकुळकर (जवाहर नवोदय विद्यालय सांगेली), प्रारब्ध बर्डे (कुडाळ), वेदा राऊळ (सावंतवाडी), डेलिशा सावंत (कणकवली), अंजली भोसले (पडेल) यांचा समावेश आहे. सातवतील आदित्य प्रभूगावकर (टोपीवाला हायस्कूल मालवण), पार्थ वजे (कुडाळ), सुरभी सावंत (सावंतवाडी), विराज कल्याणकर (कणकवली), रेवण राऊळ (खारेपाटण) यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

