बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप

बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप

Published on

कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप
कामगार कल्याणकारी मंडळ ; विमा संरक्षणासाठी प्रयत्न करणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे चिपळूण तालुक्यातील बांधकाम कामगारांना आमदार शेखर निकम यांच्या हस्ते अत्यावश्यक व सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये कामगारांना हेल्मेट, सेफ्टी शूज, हातमोजे, पाणीबॉटल, बॅटरी आणि इतर आवश्यक सुरक्षा उपकरणांचा समावेश आहे.
सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेचे भाऊसाहेब महाडीक सभागृहात हा कार्यक्रम झाला. आमदार निकम यांनी मनोगत व्यक्त करताना कामगारांना विमा संरक्षण, आरोग्याच्या सुविधा, भविष्य निर्वाह निधी मिळणे अत्यावश्यक असल्याचे सांगत त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे, असे सांगितले. सोबतच कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहता कामा नयेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही आश्वासन दिले. जास्तीत जास्त कामगारांनी आपली नोंद शासनदरबारी करून घेणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना शासनाच्या सर्व योजना व सवलतींचा लाभ मिळेल व त्यातून एक चांगली दिशा कामगारांना मिळेल, अशी भावना आमदार निकम यांनी व्यक्त केली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष नारायण खुराटे, माजी सभापती पूजा निकम, सरपंच समिक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, राजन लवेकर, जागृती शिंदे, नीलेश कदम, रमेश राणे, अशोकराव कदम व कामगार बंधू-भगिनी आदी उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com