चिकित्सक व्हा, सम्यकबुद्धीने विचार करा

चिकित्सक व्हा, सम्यकबुद्धीने विचार करा

Published on

rat२७p७.jpg -
२५N६६५२३
राजापूर ः जुवाठी येथे मार्गदर्शन करताना बी. के. गोंडाळ,
----
सम्यकबुद्धीने विचार करा
बी. के. गोंडाळ ः जुवाठीत शैक्षणिक साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः अत्त दीप भव.. याचा अर्थ कुणाचेही अनुकरण न करता स्वयंप्रकाशी व्हा, चिकित्सक व्हा. सम्यकबुद्धीने विचार करा, हा महामानव गौतम बुद्ध यांचा विचार आचरणात आणत आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करूया, असे आवाहन जुवाठी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी केले.
तालुक्यातील जुवाठी येथील बौद्धजन विकास मंडळ ग्रामीण-मुंबई व पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कांबळे, उपाध्यक्ष नरेंद्र जाधव, गणपत कांबळे, सरचिटणीस संतोष कांबळे, सहचिटणीस गौतम कांबळे, सुरेंद्र जाधव, खजिनदार नितेश कांबळे, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष कमलाकर जोशी, उपाध्यक्ष सचिन गोवळकर, सरचिटणीस संतोष कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. संध्याकाळी गंगामानीक कोकण प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष गणपत कांबळे, मानसी कांबळे, नितेश कांबळे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन मंडळाचे सचिव संतोष कांबळे यांनी केले. कोंड्ये येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सकपाळ यांचे प्रबोधनात्मक व्याख्यानही झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com