अपरांत ग्रुपला कार्य कौतुकास्पद
rat२७p८.jpg-
२५N६६५५०
रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी आयोजित स्नेहसंमेलनाला उपस्थित माजी विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक.
---
अपरांत ग्रुपचे कार्य कौतुकास्पद
डॉ. साखळकर ः गुहागरला भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : अपरांत ग्रुपने हाती घेतलेले कार्य अतिशय स्तुत्य आहे. कोकण पर्यटनक्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती, कोकणासाठी विशेष सन्मान प्राप्त करून देणाऱ्या व्यक्ती यांना समाजासमोर आणून ‘अपरांत रत्न’सारखे पुरस्कार देणाऱ्या महाविद्यालयाच्या १९९० वर्षातील विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. अशा कार्यक्रमांसाठी महाविद्यालय नेहमीच सहकार्य करेल, असे आश्वासन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी दिले.
अपरांत ग्रुपने आयोजित दुसऱ्या संमेलनात ते बोलत होते. या प्रसंगी माजी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, माजी क्रीडा संचालक प्रा. मदन भास्करे, डॉ. सीमा कदम, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, नेत्रा राजेशिर्के, राजेंद्र सावंत, विवेक देसाई, शीतल मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते. ११वी कलावर्गाची १९९० बॅच, एनसीसी, कॉलेजकट्टा ग्रुपचे माजी विद्यार्थीही उपस्थित होते. प्रितम बनप याने सादर केलेल्या ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सूत्रसंचालन प्रशांत सनगरे यांनी केले.
क्रीडा मार्गदर्शक प्रा. मदन भास्करे यांनी सांगितले की, माझ्यासमोरील अनेक विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेले असून, आपल्याला याचा सार्थ अभिमान आहे. दुसऱ्या दिवशी ग्रुपची सहल गुहागरला नेण्यात आली.
--
सांस्कृतिक कार्यक्रम
माजी विद्यार्थ्यांच्या गायन, नृत्य आणि नाट्य यांनी कार्यक्रमाला शोभा आणली. सचिन लांजेकरने गीत, संदेश कुवारने नाट्यछटा नीलम दळी यांचे सादरीकरण तसेच पल्लवी, मीना आणि भारती यांनी ग्रुपडान्स दिलखेचक झाला. यतीन-अनघा, यतीन-नेहा यांचे कपल डान्स चांगले झाले. नेहा, माया यांचे सोलो डान्स झाले. नितीन मिरकर, संजय शिंदे, प्रितम बनप, रश्मी किर, बंटी गुरव यांनी गाणी सादर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

