‘कुठे नेऊन ठेवली वैभववाडी माझी?’

‘कुठे नेऊन ठेवली वैभववाडी माझी?’

Published on

66560

‘कुठे नेऊन ठेवली वैभववाडी माझी?’

शहरात गुडघाभर पाणी; गटार खोदकामासाठी धावाधाव

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २७ ः शुक नदीपर्यंत गटार नसल्यामुळे आज संभाजी चौक परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली. या परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. या स्थितीनंतर नगरपंचायतीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी धावाधाव सुरू केली. जेसीबीच्या सहाय्याने शुक नदीपर्यंत गटार खोदल्यानंतर शहरातील पाण्याचा निचरा झाला.

शहरात राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणने रस्ता काँक्रीटीकरण करण्याच्या कामासाठी रस्ता खोदुन ठेवला आहे. त्यामुळे शुकनदी ते शांती नदीपर्यंत चिखलच चिखल दिसून येत आहे. ५०० ते ६०० मीटरचा रस्ता सध्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. एकीकडे नागरिकांना महामार्ग प्रधिकरणच्या या समस्येला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. ६५ लाख रूपये खर्चून बांधकाम केलेल्या गटारात पाणीच जात नव्हते. मात्र, सोमवारी (ता.२६) नगरपंचायतीने गटार पोखरून त्यामध्ये पाणी जाण्याची व्यवस्था केली. मात्र, गटारात गेलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शुक नदीपर्यत मार्गच नव्हता. रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पहाटेपासून शहरात पाणी साचण्यास सुरूवात झाली. नारायण वडापाव सेंटरच्या पुढे पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साचण्यास सुरूवात झाली. तासा-दीड तासांत संभाजी चौक परिसरात दीड फुटांपर्यंत पाणी साचले होते. माईणकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहत होते. या प्रकारानंतर वैभववाडीतील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अनेकांनी नगरपंचायतीच्या निर्दशनास ही बाब आणून दिल्यानंतर नगरपंचायतीचे बांधकाम सभापती रणजित तावडे, मुख्याधिकारी प्रतिक थोरात हे तेथे आले. त्यांनी महामार्ग प्रधिकरण अधिकाऱ्यांशी सपंर्क साधला. त्यांना तत्काळ शुक नदीपर्यंत गटार खोदण्यास सांगितले. त्यानंतर गटार खोदण्याच्या कामाला सुरूवात केली. गटारातून पाणी वाहण्यास सुरूवात झाल्यानंतर संभाजी चौकात साचलेले पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. मात्र, नगरपंचायतीच्या ढिसाळ नियोजनावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
---------------
वैभववाडीची ‘तुंबई’
वैभववाडी शहरात पुर्वी कधीही पाणी साचण्याचे प्रकार झालेले नाहीत. ग्रामपंचायतीला कमी निधी होता. मात्र, कधीही चिखल नव्हता. मात्र, नगरपंचायतीने कोट्यवधी रूपये खर्चून गटार बांधकामे केली. बाजुपट्टी बांधल्या, रस्ते बांधले. मात्र, पाण्याच्या निचरा होण्याकडे लक्ष दिले नाही. तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वैभववाडी शहराची ‘तुंबई’ झाल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com