शमिता तळवणेकरचा
किनळे येथे सत्कार

शमिता तळवणेकरचा किनळे येथे सत्कार

Published on

66564

शमिता तळवणेकरचा
किनळे येथे सत्कार

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २७ ः रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाची विद्यार्थिनी शमिता तळवणेकर हिने दहावी परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवून वेंगुर्ले तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबाबत किनळे गावाच्या वतीने सरपंच दीपक नाईक यांनी तिचा सत्कार केला.
किनळेसारख्या गावातून एका सर्वसामान्य कुटुंबातील शमिता हिने आपल्या आई-वडिलांच्या प्रेरणेतून व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले. किनळे येथून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या विद्यालयात जाऊन तिने दहावी अभ्यासक्रमाचे नियोजन करून अभ्यास केला. तिला शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व आई प्राजक्ता व वडील प्रशांत तळवणेकर यांची प्रेरणा मिळाली. या देदीप्यमान यशाने गावाची शान वाढविल्याबद्दल किनळे सरपंच नाईक यांनी शमिता हिचा सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शमिताने मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक असून प्रत्येक मुलांनी नियोजनपूर्वक अभ्यास केल्यास यश निश्चित संपादन करता येते, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com