१५ टक्केच वाहनधारकांनी बसवल्या नव्या नंबरप्लेट
जिल्ह्यात १५ टक्केच वाहनांना बसल्या नव्या नंबरप्लेट
शासनाकडून ३० जूनपर्यंत मुदतवाढ; ३३ टक्के वाहनधारकांकडून नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : शासनाने वाहनांच्या सुरक्षेसाठी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी एचएसआरपी (हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट) बंधनकारक केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कार्यवाही सुरू झालेली आहे. आतापर्यंत ३२ हजार २५४ वाहनांना म्हणजे १५ टक्के वाहनांना नवीन नंबरप्लेट बसवण्यात आली आहे तर ३३ टक्के वाहनधारकांनी नोंदणी केली असून, पुढील प्रक्रिया सुरू आहे.
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या एकूण वाहनांची संख्या २ लाख ११ हजार ४२३ आहे. त्यापैकी आतापर्यंत ६९ हजार २४० वाहनांनी नव्या नंबरप्लेटसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३२ हजार २५४ वाहनांना ही नंबरप्लेट बसवण्यात आली आहे. सुरवातीला शासनाने नवीन नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ती ३० एप्रिलपर्यंत वाढवली. आता पुन्हा ३० जूनपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना एचएसआरपी बसवणे सक्तीचे केले आहे. त्यासाठी जिल्ह्यात २७ फिटमेंट सेंटर्स असून, या सेंटरवर ऑनलाइन बुकिंग करावे लागते. सुरवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला होता. याबाबत वाहनचालकांकडून तक्रारीही पुढे आल्या होत्या. त्यावर मात करत संबंधित केंद्रावर प्रक्रिया सुरू आहे; मात्र शासनाच्या सूचनेनुसार, नवीन नंबरप्लेट बसवण्यासाठी चालकांचा कल कमी असल्याचे दिसत आहे.
---
कोट
२०१९ पूर्वीच्या वाहनांची संख्या २ लाख ११ हजार ४२३ इतकी आहे. त्यापैकी या नंबरप्लेटसाठी ६९ हजार २४० वाहनांनी बुकिंग केले आहे. त्यापैकी १४ मे पर्यंत ३२ हजार २५४ वाहनांना एचआरएसपी बसवण्यात आली आहे. ही नंबरप्लेट बसवण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवली आहे.
- राजवर्धन करपे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी
--
या वाहनांना बसवली हायसिक्युरिटी नंबरप्लेट
प्रकार* एकूण वाहने* हायसिक्युरिटी प्लेट बसवली
दुचाकी* २,६२,७८८* २२,२४९
तीनचाकी* ११,५०९* १,१९०
चारचाकी* ५३,३५०* ७,५८३
इतर वाहने* १४,५८६* १,२३२
---------------------------
एकूण* ३,४१,५३३* ३२,२५४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

