संघटनेच्या सदस्यत्वासाठी नाभिक बांधवांना आवाहन
नाभिक बांधवांना
कणकवलीत आवाहन
तळेरे ः कणकवली तालुक्यात लवकरच सलून ब्युटी पार्लर असोसिएशनची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी सर्व नाभिक बांधवांना सदस्यत्व घेण्याचे आवाहन केले आहे. मुंबई येथील सलून ब्युटीपार्लर असोसिएशनच्या (मान्यताप्राप्त ट्रेड युनियन संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन) वतीने ही संघटना स्थापन केली जात आहे. नुकतीच मेकअप आर्टिस्ट आणि असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद लाड, हेअर आर्टिस्ट सचिन टक्के, तुषार चव्हाण आणि किसन कोऱ्हाळे यांनी कणकवलीला भेट देऊन सलून ब्युटी पार्लर असोसिएशनसाठी सभासद अर्ज वितरित केले. या असोसिएशनचे सदस्यत्व दोन वर्षांसाठी असेल. असोसिएशनच्या माध्यमातून सदस्यांना अधिकृत ओळखपत्र आणि विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळेल. तसेच पेन्शन योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगण्यात आले. कणकवली तालुका नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण, तालुका उपाध्यक्ष नीलेश चव्हाण, तालुका कार्याध्यक्ष संजय कुबल, तालुका सरचिटणीस प्रवीण कुबल, नाभिक नेते अनिल अणावकर, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण यांनी बांधवांना सदस्यत्व घेण्याची विनंती केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

