आरोग्य विभागामार्फत साथरोगांबाबत आवाहन
आरोग्य विभागामार्फत
साथरोगांबाबत आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २७ ः मॉन्सून कालावधीत जून ते ऑक्टोबर या कालावधीत साथरोग, अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती आदींसाठी जोखमीचा आहे. आरोग्य विभागामार्फत साथरोग टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली. जिल्हास्तरावर दोन व तालुकास्तरावर एक अशा एकूण १० वैद्यकीय मदत पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरावर व प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास कार्यरत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. जोखीमग्रस्त गावांची निवड करून यादी तयार करण्यात आलेली आहे. लेप्टोस्पायरोसीससाठी १३ (देवगड-रामेश्वर, कणकवली-हळवल, वागदे, कुडाळ-किनळोस धनगरवाडा, घावनाळे, तेंडोली, रानबांबुळी, धुरीटेंबनगर, वेंगुर्ले-होडावडा, वेतोरे, सावंतवाड़ी-आंबोली, तळवडे परबवाड़ी) व जलजन्य आजारांसाठी ३ (वैभववाडी-करुळ, कणकवली-कोळोशी, वेंगुर्ले-कनयाळ गावतळे) गावांची निवड करण्यात आलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील जनतेने घ्यावयाची खबरदारी म्हणून खालील सूचनांचे पालन करावे. साथरोगाची लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.