‘सुझुकी एक्सेस १२५’ची 
कुडाळमध्ये नवी एडिशन

‘सुझुकी एक्सेस १२५’ची कुडाळमध्ये नवी एडिशन

Published on

66617

‘सुझुकी एक्सेस १२५’ची
कुडाळमध्ये नवी एडिशन

‘श्री विनायक व्हील्स’मध्ये अनावरण

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः येथील एमआयडीसीतील श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड शो-रुममध्ये मोटर वाहन निरिक्षक सचिन पोलादे यांच्या हस्ते सुझुकी एक्सेस १२५ राईड कनेक्ट टीएफटी एडिशन दुचाकीचे नुकतेच अनावरण झाले. यावेळी शो-रुमचे चेअरमन राजेंद्र तेरसे, सहाय्यक मोटर वाहन निरिक्षक धनंजय हीले, मानिक चोरमले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तेरसे यांनी या दुचाकीच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती देत नविन पिढीची पसंती लक्षात घेऊन याची बांधणी करण्यात आली आहे. डार्क मोड, लाईट मोड, ब्राईटनेस कमी जास्त, हवामान अलर्ट, कॉल मॅसेज अलर्ट, साईड स्टँड अर्लट, मोबाईल बॅटरी परसेन्टेज ही स्पीडोमीटरची वैशिष्ट्ये असल्याचे सांगितले. श्री. पोलादे यांनी हेल्मेट संदर्भात माहिती देताना न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकी वाहन विक्रेत्यांनी ग्राहकांना २ हेल्मेट पुरविणे व वाहन नोंदणीवेळी ते पुरविल्याची खातरजमा करणे व यात कोणत्याही प्रकारे हयगय होऊ देऊ नये, असे सूचित केले. उपस्थितांना हेल्मेट वापरसंबधीचे फायद्यांबाबत माहिती दिली. तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध असलेली ही नवी दुचाकी सर्वाना पसंतीस येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दुचाकीची विक्री येथील विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेडच्या शोरुममध्ये सुरु आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com