पाणी योजनांचे स्त्रोत बळकटीकरण गरजेचे

पाणी योजनांचे स्त्रोत बळकटीकरण गरजेचे

Published on

-ratchl२७१.jpg-
२५N६६६१५
चिपळूण ः प्रशिक्षणास उपस्थित अधिकारी व कर्मचारी.
---
पाणी योजनांच्या स्रोतांचे बळकटीकरण करा
उमा घार्गे-पाटील ः चिपळुणात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः ग्रामीण भागात मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. या योजना दीर्घकाळ टिकण्यासाठी या संबंधी नियुक्ती केलेल्या समितीचे योगदानही तितकेच महत्वाचे आहे. दीर्घकालीन संसाधनाचे व्यवस्थापन करण्यासाठी पाणीयोजनांचे स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण करणे ही काळाची गरज आहे. शाश्वतता केवळ पर्यावरणाशीच संबंधित नसून, सध्याच्या आणि भविष्यातील जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी शाश्वतता एक आवश्यक भाग आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांनी कापसाळ येथील प्रशिक्षण शिबिरात केले.
जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्वच्छता समितीमधील पदाधिकारी व कर्मचाऱ्यासांठी स्रोत बळकटीकरण व शाश्वती करण्यासाठी दोनदिवसीय अनिवासी प्रशिक्षणाचे आयोजन कापसाळ येथील माटे सभागृहात केले होते. गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांच्या हस्ते या शिबिराचा प्रारंभ झाला. या शिबिरास ग्रामपंचायत स्तरावरील स्वच्छता समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षा रक्षक, रोजगार सेवक यांना निमंत्रित केले होते. या वेळी गटविकास अधिकारी घार्गे-पाटील म्हणाल्या, येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. काही ठिकाणी उन्हाळ्याच्या कालावधीत पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यासाठी गावोगावी शाश्वत जलस्रोत निर्माण करण्याची गरज बनली आहे.
कोट्यवधीच्या पाणीयोजना केल्या तरी त्यासाठीचा आवश्यक पाणीसाठा गाावातच उपलब्ध करायला हवा. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हायला हवेत. पूर्वी ग्रामीण भाग वड, पिंपळासारखी झाडे मोठ्या प्रमाणात होती. ही झाडे जमिनीत पाणी साठवून ठेवण्यासाठी मोलाची मदत करतात. त्यामुळे वड, पिंपळसारख्या रोपांची लागवड करून त्याचे जतन करायला हवे. गावातील जलस्रोत बळकट झाल्यास ग्रामस्थांना पुरेसा पाणीपुरवठा होण्यास व्यत्यय येणार नाही. त्याचबरोबर पाणीयोजनांच्या दुरुस्तीचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्या दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल. या प्रसंगी वडाचे व कांदळवन रोपाचे वाटप करण्यात आले तसेच शासनाकडून उपलब्ध झालेले रासायनिक कीटचे ग्रामपंचायतींना वितरण करण्यात आले. या वेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी स्वप्नील कांबळे व गटसंसाधन केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com