ःमे महिन्यातच थांबला टॅंकर
चिपळूण तालुका टँकरमुक्त
मे महिन्यातील पावसाने दिलासा; नदी, नाले तुडुंब
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः गेले आठवडाभर पडणाऱ्या पावसाने टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. नैसर्गिक जलस्रोत पुन्हा प्रवाहित झाल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात टँकरने होणारा पाणीपुरवठा अखेर मे महिन्यातच थांबला आहे.
तालुक्यात मुबलक पाऊस असताना तालुका अद्यापही टँकरमुक्त झालेला नाही. दरवर्षी फेब्रुवारी, मार्च महिना उजाडताच पाणीटंचाई उद्भवणाऱ्या संबंधित गावातून प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा करावा यासाठीचे अर्ज दाखल होतात. यंदाही तालुक्यात पाणीटंचाई समस्या उद्भवली असून, डोंगर, दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या धनगरवाड्यांमधून प्रशासनाकडे टँकरने पाणीपुरवठा करावा यासाठीचा पहिला अर्ज दाखल झाला होता. पंचायत समितीकडे टंचाईग्रस्तासाठी स्वमालकीचा टँकर नसल्याने दोनऐवजी एक खासगी टँकर अधिग्रहित करून सर्व्हेक्षणाअंती अडरे, कोंडमळा, सावर्डे, कुडप, अनारी, कादवड, टेरव या गावातील धनगरवाड्या पहिल्यांदा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. जसजसा वातावरणात उष्मा वाढू लागला तसतशी टंचाईग्रस्त गावामध्ये वाढ होत होती.
प्रशासनाने तालुक्याचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा करताना ५२ गावे आणि २४७ वाड्यांच्या टंचाई निवारणासाठी १ कोटी ३४ लाखांचा अपेक्षित खर्च नमूद केला आहे. टंचाईग्रस्तांची तहान भागवताना एका टँकरवर मोठा ताण येत असतानाही अशा स्थितीतही आतापर्यंत तालुक्यातील ९ गावांमधील १३ वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला गेला. वातावरणातील वाढता उष्मा लक्षात घेता तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होतेय की, काय अशी चिन्हे निर्माण झाली असतानाच मॉन्सूनपूर्व पावसामुळे नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले. यामुळे प्रशासनाने टँकर बंद केला. तालुक्यात २१ मे रोजी कुडप येथे शेवटचा टँकर धावला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.