पौष्टिक तृणधान्य उपअभियान
पीक प्रात्यक्षिकाबाबत आवाहन

पौष्टिक तृणधान्य उपअभियान पीक प्रात्यक्षिकाबाबत आवाहन

Published on

पौष्टिक तृणधान्य उपअभियान
पीक प्रात्यक्षिकाबाबत आवाहन

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २७ ः राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान, पौष्टिक तृणधान्य उपअभियान (श्रीअन्न) पीक प्रात्यक्षिकासाठी जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थांनी महाडीबीटी संकेतस्थळावर २९ मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियानः पौष्टिक तृणधान्य उपअभियान (श्रीअन्न) अंतर्गत नाचणी, वरी या पौष्टिक तृणधान्याचे क्षेत्र व उत्पादकता वाढीसाठी पीक प्रात्यक्षिके जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. पीक प्रात्यक्षिके शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था याद्वारे राबविण्यात येणार आहे. शेतकरी गट हा ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणी केलेला तसेच कोणत्याही शासन यंत्रणेकडे (आत्मा, उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड आदी) नोंदणीकृत असावा. पीक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे नोंदणीकृत शेतकरी गट, कंपनी, संस्था निवड प्रथम अर्ज करण्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या गटात शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यास संबंधित गटाने २५ शेतकऱ्यांची प्रात्यक्षिकासाठी निवड करायची आहे. गटातील शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना शेतकऱ्याची ‘अॅग्रीस्टॅक’वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com