खेडमधील ५०३ घरे पूरग्रस्त यादीत
खेडमधील दोन प्रभागांतील
५०३ घरे पूरग्रस्तांच्या यादीत
खेड, ता. २७ : नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी नगरपालिका सज्ज झाली आहे. शहरातील दोन प्रभागांतील ५०३ घरांचा पूरप्रभावित घरांच्या यादीत समावेश केला आहे. त्यांची लोकसंख्या सहा हजारांच्या आसपास असल्याने उपाययोजना केल्याची माहिती मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली. मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास जगबुडी नदीच्या पुराचे पाणी बाजारपेठेत घुसत असल्याने व्यापाऱ्यांसह नजीकच्या रहिवाशांची पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन नगरप्रशासन उपाययोजना करते. मॉन्सूनपूर्व कामेही अंतिम टप्प्यात आहेत. नालेसफाई व गटारे स्वच्छता करण्याची कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत.
शहरातील विशेषतः मटण मच्छीमार्केट, सफा मस्जिद चौक, साठेमोहल्ल्याचा काही भाग, पोत्रिक मोहल्ला, तांबे मोहल्ला, गांधीचौक, निवाचा तळ, वाल्कीगल्ली, गुजरआळीचा काही भाग, पानगल्ली, बाजारपेठ, खांबतळे, नगर पालिका कार्यालय, तीनबत्तीनाका, खेड-दापोली रोड, ब्राह्मणआळी, कासारआळी, सोनारआळीचा काही भाग, साळीवाडा अशा ठिकाणांचा पूरप्रभावित क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. शहरातील दोन प्रभागातील नागरिकांनी कोणतीही आपत्ती ओढवल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

