रक्तदान चळवळ हे विधायक कार्य
swt283.jpg
66728
पावशीः बेलनदी ग्रुपच्या वतीने आमदार निरंजन डावखरे यांचे स्वागत करताना संजय कोरगावकर. बाजूला प्रभाकर सावंत, प्राजक्ता बांदेकर आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
रक्तदान चळवळ हे विधायक कार्य
निरंजन डावखरेः पावशीतील शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ः बेलनदी पावशी हा ग्रुप रक्तदानासारखी सामाजिक चळवळ गेली १८ वर्षे सलग राबवित आहे. हे विधायक कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी पावशी येथील रक्तदान शिबिरात केले. या शिबिरात ७९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमास हातभार लावला.
बेलनदी ग्रुप पावशी आयोजित रक्तपेढी सिंधुदुर्ग पावशी गावातील सामाजिक काम करणारे मंडळाचे कार्यकर्ते आणि मित्रपरिवार यांच्या सहकार्याने सलग अठराव्या वर्षी पावशी येथे शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर झाले. शिबिरास अनुपमा नरेश भांडारकर, प्राप्ती तेली, अंजली रेडकर, वैदही पाटकर, प्राची नालंग या पाच महिला रक्तदात्यांसहित महेंद्र बांदेकर, प्रसाद तवटे, सदानंद सावंत, अमित मयेकर, गजा घाटकर, प्रणव कोरगावकर, प्रवीण बहिरे, वैभव वर्दम, राजवीर पाटील, प्रवीण ताम्हाणेकर, अनुराग पाटील, गोविंद कोरगावकर, शैलेश कोरगावकर, प्रणव कोरगावकर, रोहन भोगटे, गिरीश सुकी, दशरथ महाडेश्वर, गणेश तवटे, यश मयेकर, बाबुराव वारंग, सचिन वारंग, अवधूत वाटवे, योगेंद्र तवटे, गौरव सुकी, ऋषिकेश तवटे, महेश पावसकर, अनुज चव्हाण, कैवल्य तवटे, गणेश भोगटे आदी ७९ जणांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.
समाजाची गरज ओळखून आपण रक्तदानाची चळवळ गेली १८ वर्षे जिवंत ठेवून सातत्यपूरक्तदान शिबिर आयोजन केल्याबद्दल आमदार डावखरे यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी त्यांच्या समवेत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, कुडाळ भाजप अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, कुडाळ रोटरी क्लब अध्यक्ष डॉ. संजय केसरे, गजानन कांदळगावकर, अभिजित परब, प्रमोद भोगटे, विलास कुडाळकर, नगरसेविका संध्या तेरसे, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, नगरसेवक उदय मांजरेकर, गणेश भोगटे, रुपेश कानडे, श्रीपाद उर्फ पप्या तवटे आदी उपस्थित होते. सलग अठराव्या वर्षी रक्तदान शिबिर आयोजित करून यशस्वी केल्याबद्दल ग्रुपचे संजय कोरगावकर यांना रक्तपेढी सिंधुदुर्गतर्फे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व झाडाचे रोपटे देऊन सन्मानित केले. शिबिराच्या समारोप प्रसंगी संध्या तेर्से, संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक योगेश लाड यांनी केले. आभार संजय कोरगावकर यांनी मानले. शिबिर यशस्वीतेसाठी बेलनदी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.