समाजहिताचे भान राखून जगज्जेते व्हा
swt286.jpg
66731
डेगवेः येथे गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविताना माजी सैनिक मनोहर देसाई व इतर मान्यवर.
समाजहिताचे भान राखून जगज्जेते व्हा
मनोहर देसाईः डेगवे प्रशालेत दहावीतील गुणवंतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २८ः ‘मिशन सिंदूर’ यशस्वी केलेल्या भारतीय लष्करातील दोन रणरागिणींप्रमाणे मुलींनी देखील मागे न राहता निर्भयपणे पुढे जावे. तुमच्यातील धमक जगाला दाखवून द्या. आयुष्यात आकाशाला गवसणी घालताना या मातीला, शाळेला विसरू नका. आपण समाजाचे देणे लागतो, याचे भान ठेवा, असे आवाहन कळणे गावचे माजी सैनिक मनोहर देसाई यांनी डेगवे येथे केले.
डेगवे येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात श्री. देसाई बोलत होते. श्री देव स्थापेश्वर विद्या विकास मंचच्या वतीने माध्यमिक विद्यालय डेगवे प्रशालेत दहावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा झाला. यावेळी व्यासपीठावर मनोहर देसाई, रामा देसाई, गंगाराम देसाई, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका वैदेही देसाई, प्रभाकर तेली, उत्तम देसाई, मुख्याध्यापक संजय सावंत आदी उपस्थित होते.
दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या गायत्री केसरकर, रिया शिंदे, नेहा कदम व शर्वरी ठाकूर या विद्यार्थ्यांना मंचतर्फे रोख रक्कम, पुष्पगुच्छ तसेच गुणपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रशालेत दर शनिवारी घेतल्या जाणाऱ्या ‘हॅप्पी सॅटर्डे’ उपक्रमासाठी मंचतर्फे बुद्धिबळ खेळाचे साहित्य प्रशालेला भेट देण्यात आले.
खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळावी, आर्थिक पाठबळ मिळावे, त्यांच्यातील सुप्त गुणांना करिअरच्या दृष्टीने योग्य मार्ग मिळावा, स्पर्धा परीक्षा, नोकरीच्या संधी याबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, या हेतूने श्री देव स्थापेश्वर विद्या विकास मंचची स्थापना केली आहे. माजी विद्यार्थ्यांनी समाजभान राखून या शैक्षणिक कार्यात हातभार लावावा. गरजू आजी-माजी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, करिअर संदर्भात मदतीची गरज असेल तेव्हा मंचकडे यावे. विद्यार्थ्यांना नेहमीच सहकार्य मिळेल, असे श्री. तेली यांनी सांगितले. माजी विद्यार्थी मनोज देसाई यांनी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रिना मोरजकर यांनी, प्रास्ताविक रामचंद्र वरक यांनी केले. आभार वीणा देसाई यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.