सुधारित संचमान्यता मंजुरी निर्णयाबाबत डावखरेंचे कल्याणकरांनी मानले आभार

सुधारित संचमान्यता मंजुरी निर्णयाबाबत डावखरेंचे कल्याणकरांनी मानले आभार

Published on

swt285.jpg
66730
बांदाः शिक्षक आमदार निरंजन डावखरे यांचे आभार व्यक्त करताना गुरु कल्याणकर. सोबत श्वेता कोरगावकर व इतर.

सुधारित संचमान्यता मंजुरी निर्णयाबाबत
डावखरेंचे कल्याणकरांनी मानले आभार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २८ः राज्यात क्रीडा-कला, संगीत, कार्यानुभव-आयसीटी या विषयांच्या शिक्षक पदांना नऊ वर्षे संच मान्यता नव्हती. त्यामुळे राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या पुरेशा प्रमाणात असून देखील केवळ संचमान्यतेत पद उपलब्ध नसल्याने क्रीडा व कला शिक्षकांची पदभरती रखडली होती.
याबाबत बांदा भाजपचे पदाधिकारी गुरू कल्याणकर यांच्याकडून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांना निवेदन देऊन संच मान्यतेस मंजुरी देत शिक्षक भरतीची मागणी केली होती. याबाबत त्यांनी आमदार डावखरे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. याविषयीची गांभीर्यता समजून आमदार डावखरे यांनी हा विषय सरकारच्या निदर्शनास आणून देत, अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडून तब्बल नऊ वर्षांनी पुन्हा एकदा संच मान्यतेत बदल करणाऱ्या आणि संचमान्यतेत सुधारित निकष विहित करणाऱ्या संचमान्यतेस मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक उमेदवारांना तसेच शिक्षकांना थेट पद भरतीत सहभाग मिळणार आहे. याबाबत श्री. कल्याणकर यांनी आमदार डावखरे यांची भेट घेत आभार व्यक्त केले आहेत.
राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूळकर यांच्या नेतृत्वाखाली देखील याकरिता शासन दरबारी वेळोवेळी आवाज उठवण्यात आला होता. या निर्णयामुळे शिक्षक पदभरतीचा मार्ग देखील मोकळा झाल्याने शिक्षकांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. तसेच क्रीडा व कलाशिक्षक पदाच्या संच मान्यतेमधील समावेशाने राज्यातील मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने क्रीडा आणि कला शिक्षणाला चालना मिळणार आहे. यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com