पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांना आवाहन
पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी
शेतकऱ्यांना आवाहन
पावसः राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत नाचणी व वरई पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि बियाणे बदलाचे महत्त्व विचारात घेऊन सुधारित वाणांच्या प्रसारासाठी पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. पीक प्रात्यक्षिक हे २५ एकर क्षेत्रात समूह प्रात्यक्षिकच्या (क्लस्टर) धर्तीवर राबवण्यात येणार आहे. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषीक्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था व बचतगट यांनी महाडीबीटी पोर्टलवर mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर २९ मे पर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. हा कार्यक्रम १०० टक्के अनुदानावर असून, शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे राबवला जाणार आहे. प्रात्यक्षिकात जिल्ह्यासाठी नाचणीचा ७२० हेक्टर व वरई पिकाचा ४० हेक्टरचा लक्षांक प्राप्त आहे. पीक प्रात्यक्षिकांतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकरी गट ३१ मार्चपूर्वी नोंदणीकृत असावा. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषीक्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इत्यादींनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्याला प्राधान्य दिले जाणार आहे. ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करताना ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी वापरण्यात यावा.
-------
वीज ग्राहकांसाठी
नियंत्रण कक्ष
पावस ः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. यामुळे महावितरणचे खांब पडणे, वीजवाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडून वीजपुरवठा खंडित होत आहे. ग्राहकांना वीजपुरवठ्याबाबत वेळेत व अचूक मिळावी म्हणून महावितरणने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील वीजग्राहक आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधावा. विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी १८००२३३३४३५ व १८००२१२३४३५ तसेच १९१२ अशा तीन टोल फ्री क्रमांकाची सोय कंपनीने केली आहे. मध्यवर्ती ग्राहकसेवा केंद्राद्वारे या क्रमांकावर २४ तास सेवा दिली जाते. या पद्धतीचा वापर केल्यास ग्राहकांची तक्रार योग्य व्यक्तीपर्यंत व वेळेत पोहोचवून त्या वेळेत सोडवण्यास मदत होऊ शकते. मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या ग्राहकांना खंडित वीजपुरवठा, वीजबिल व इतर माहिती SMS वर पाठवली जाते. त्यासाठी ग्राहकांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदवणे आवश्यक आहे.
------
जिल्हा परिषद येथे
सावरकर जयंती
रत्नागिरी ः जिल्हा परिषद श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता तुषार बोरसे आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विनायक सावरकर जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.