चिपळूण-वृक्षारोपणाची चळवळ व्हायला हवी

चिपळूण-वृक्षारोपणाची चळवळ व्हायला हवी

Published on

ratchl281.jpg
66817
चिपळूण ः पिंपळी बु. येथे वृक्षारोपण करताना अभिनेते मकरंद अनासपुरे. शेजारी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, सरपंच अंजली जांबुर्गे, नाम फाउंडेशनचे पदाधिकारी.
---------------

वृक्षारोपणाची चळवळ व्हायला हवी
मकरंद अनासपुरे ; पिंपळी बुद्रूकमध्ये वृक्षारोपण
चिपळूण, ता. २९ ः निसर्ग बोलत नसला तरी तो अशा पद्धतीने व्यक्त होत असतो. यावर्षी मे महिन्यामध्येच जोरदार पाऊस झाला. यातून निसर्गाचा समतोल ढासळला आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे वृक्षारोपणाची चळवळ व्हायला हवी, लोकसहभाग वाढायला हवा, असे मत नाम फाउंडेशनचे व ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी येथे व्यक्त केले. तालुक्यातील पिंपळी बु. येथे अनासपुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
महाराष्ट्र शासन वसुंधरा अभियान, ग्रामपंचायत पिंपळी बु., काळकाई फाउंडेशन यांच्या माध्यमातून पिंपळी बु. येथे अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते वृक्ष लागवड व मियावाकी जंगलनिर्मितीचा प्रारंभ झाला. या वेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, नामचे कोकण विभाग समन्वयक समीर जानवलकर, शाहनवाज शाह, महेंद्र कासेकर, पिंपळीच्या सरपंच अंजली जांबुर्गे आदी उपस्थित होते. या वेळी प्रांताधिकारी व अनासपुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. श्री. अनासपुरे म्हणाले, आम्ही राज्यभरात वृक्षारोपण करत आहोत. पुण्यातील खडकवासला धरणाच्या बाजूला मोठे जंगल उभे राहिले आहे. त्या ठिकाणी जैवविविधता निर्माण झाली आहे. जैवविविधता वाढली तरच निसर्ग टिकेल; मात्र, हे काम कुण्या एकट्याचे नाही. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने या कार्यात सहभाग घ्यायला हवा. याप्रसंगी प्रांताधिकारी लिगाडे व अनासपुरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बापू काणे, कैसर देसाई, रवींद्र सागवेकर, देवस्थान समिती अध्यक्ष सदानंद कडव, नंदा सागवेकर, हरिश्चंद्र चव्हाण उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com