पिंगुळीत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
swt292.jpg
66958
पिंगुळीः ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मालवण रेस्क्यू टीमच्या वतीने खोडदेश्वर नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. (छायाचित्रः अजय सावंत)
पिंगुळीत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
रेस्क्यू बोटचे लोकार्पणः ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २९ः मालवण रेस्क्यू टीमच्या वतीने पिंगुळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पिंगुळी खोडदेश्वर नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.
कर्ली नदीवर पिंगुळी खोडदेश्वर मंदिर येथे रेस्क्यू बोटचे उद्घाटन नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या हस्ते बुधवारी (ता. २८) सायंकाळी करण्यात आले. मेमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील नद्या-ओहोळांवर मोठ्या प्रमाणात पाणी आलेले आहे. कर्ली नदीला दरवर्षी मोठ्या प्रमाणात पूर येतो. हा पूर दोन-दोन दिवस असतो. या नदीच्या काठावर वसलेल्या पिंगुळी गावातील शेटकरवाडी, धुरीटेंबनगर तसेच पलीकडील मांडकुली गावातील काही वाड्यांना पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसतो. गेली बरीच वर्षे या समस्येचा सामना येथील ग्रामस्थ करत आहेत.
पूरस्थितीमध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये, याबाबतची खबरदारी म्हणून आपत्तीच्या पार्श्वभूमीवर रेस्क्यू बोट देण्यात आली आहे. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनाच्या बैठकीच्या वेळी ही बोट मंजूर झाली होती. सुमारे १२ लाख रुपये किंमतीची बोट ग्रामपंचायतीच्या ताब्यात राहणार आहे. आपत्तीवेळी येणाऱ्या संकटाशी सामना कसा करावा, पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या व्यक्तींना रेस्क्यू बोटच्या माध्यमातून कसे बाहेर काढावे, याबाबतचे प्रशिक्षण पिंगुळी ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांना मालवण रेस्क्यू बोटच्या टीमने दिले. रेस्कू बोट उद्घाटन प्रसंगी सरपंच अजय आकेरकर, मंडळ अधिकारी श्री. गुरव, तलाठी श्री. बिरादार, पोलिसपाटील सतीश माडये, बाबली पिंगुळकर, ग्रामपंचायत सदस्य शशांक पिंगुळकर, मंगेश मसगे, बंड्या पिंगुळकर, महेश पालकर, रामदास आगलावे, सागर वालावलकर, श्री. गावडे, श्री. धुरी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.