सुतार समाजातर्फे ७ जूनला गुणगौरव

सुतार समाजातर्फे ७ जूनला गुणगौरव

Published on

सुतार समाजातर्फे
७ जूनला गुणगौरव
कुडाळः सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळातर्फे ७ जूनला सकाळी १० वाजता झाराप येथील विश्वकर्मा भवन (भवानी मंदिरानजीक) शिष्यवृती परीक्षा, दहावी-बारावी, पदवी, पदव्युत्तर परीक्षेमध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या सुतार ज्ञाती बांधवांच्या मुलांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे. जिल्ह्यातील सुतार ज्ञातीतील विद्यार्थ्यांनी आपापल्या तालुक्यातील जिल्हा कार्यकारिणी सदस्याशी संपर्क साधावा. जे विद्यार्थी ७ ला सकाळी १० पर्यंत नावे देतील व उपस्थित असतील, त्यांचे क्रमांक काढून त्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी खजिनदार अनंत मेस्त्री (माणगाव) यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सुतार समाज ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रकांसह उपस्थित राहावे.
...........
तेंडोलीत सोमवारी
‘कांदाजन्म’ नाटक
कुडाळः तेंडोली येथील श्री देव रवळनाथ पंचायतन मंदिरात सोमवारी (ता.२) रात्री ९ वाजता जिल्ह्यातील निवडक दशावतार कलाकारांचे ‘कांदाजन्म’ हे संयुक्त दशावतार नाटक होणार आहे. नाटकामध्ये गणपती-विनायक सर्वेकर, रिद्धी सिद्धी-चैतन्य गावडे, प्रल्हाद-विलास तेंडोलकर, नारद-पंढरी घाटकर, मणीध्वज-गिरीश राऊळ, मायासुर-वैभव धुरी, वासना-बाळा कलिंगण, मुलगी-बंटी कांबळी, पती-पिंट्या दळवी, पुजारी-प्रवीण गावकर, कली-सुनील खोर्जुवेकर, अनैतिक-प्रशांत खानोलकर यांच्या भूमिका असून संगीत साथ हार्मोनियम-अमोल मोचेमाडकर, पखवाज-अर्जुन सावंत व झांज-विनायक राऊळ यांची आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन तेंडोली ग्रामस्थांनी केले आहे.
...................
श्रावण येथील मोबाईल
टॉवर अखेर कार्यान्वित
मालवणः श्रावण येथील बीएसएनएल टॉवर बंद होता. या संदर्भात स्थानिक कार्यकर्ते अभी लाड, योगेश परब व शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी मालवण बीएसएनएल कार्यालयाला भेट देत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. वराड येथील टॉवरवरून श्रावण येथील टॉवरला मायक्रोलेन्स जोडून टॉवर सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी तातडीने पूर्ण करण्यात आल्याने हा टॉवर अखेर कार्यान्वित झाला आहे. अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत टॉवर कार्यान्वित करून देऊ, अशी ग्वाही दिली होती. मुसळधार पावसामुळे कामात अडथळा येत होता. मायक्रोलेन्स टेस्टिंग काम थांबले होते. जवळील पाडलोस टॉवरवरून टेस्टिंग होत नव्हते. त्यामुळे टॉवर सुरू झाला नव्हता; मात्र कार्यवाही पूर्ण करून टॉवर कार्यान्वित करण्यात आला. अनेक वर्षे रखडलेले टॉवरचे काम मार्गी लागले, अशी माहिती अभी लाड यांनी दिली. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह बीएसएनएलचे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच अधिकारी गोवेकर, फुटाणे यांचेही आभार मानण्यात आले.
.......................
उभादांडा येथे उद्या
वर्धापन दिन सोहळा
वेंगुर्लेः उभादांडा-नमसवाडी येथील देव ब्राह्मण मंदिराचा ५४ वा वर्धापन दिन शनिवारी (ता. ३१) विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी लघुरुद्र, अभिषेक, सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी भजन व ७.३० वाजता पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन ब्राह्मण प्रासादिक सेवा मंडळाने केले आहे.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com