संक्षिप्त-मळगाव वाचनालयाच्या संचालकाचा राजीनामा
मळगाव वाचनालयाच्या
संचालकाचा राजीनामा
बांदाः मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाच्या संचालकपदाचा गुरुनाथ नार्वेकर यांनी राजीनामा दिला. अपरिहार्य कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्यांची २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी नवनिर्वाचित कार्यकारी मंडळात संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. पत्रकात म्हटले आहे की, ते वाचनमंदिरच्या स्थापनेपासूनच वाचनालयाशी जोडले गेले आहेत. गेली दहा वर्षे वाचनालयाचे कार्यवाह म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी वाचनालयाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच वाचन संस्कृतीची चळवळ घरोघरी पोहोचविण्यासाठी सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न केले. सामाजिक क्षेत्रातील अन्य संस्थांची जबाबदारी असूनही त्यांनी वाचनमंदिरला जास्तीत जास्त वेळ देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला, असेही म्हटले आहे. कार्यवाहपदाच्या या कालावधीत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.
.................
सावंतवाडीत भाजपतर्फे
उद्या महिला मेळावा
बांदाः पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या वतीने सावंतवाडी येथे शनिवारी (ता. ३१) महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ४ वाजता राजवाडा हॉल येथे होणाऱ्या या मेळाव्याला पालकमंत्री नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सरचिटणीस महेश सारंग, प्रसन्ना देसाई, जिल्हा संयोजक अहिल्यादेवी होळकर जयंती समारंभाच्या प्रमुख वक्त्या डॉ. ज्योती तोरसकर आदी मान्यवर उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. महिलांनी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी केले आहे.
.................
अंध बांधवांचा रविवारी
सावंतवाडीत स्नेहमेळा
सावंतवाडीः हेलन केलर यांच्या जन्मदिनानिमित्त रविवारी (ता. १) नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी सावंतवाडीच्या वरच्या मजल्यावरील नॅब सभागृहामध्ये दृष्टिबाधितांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. कार्यक्रम संपल्यानंतर भोजनाची व्यवस्था केलेली आहे. दृष्टिबाधितांना येण्या-जाण्याचा प्रवासखर्च देण्यात येईल. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त दृष्टिबाधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नॅब सिंधुदुर्गचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांनी केले आहे.
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.