हातिवलेतील टोलनाका पुन्हा सुरू होण्याचे संकेत
-rat२९p१६.jpg-
२५N६६९६२
राजापूर ः हातिवले येथे उभारण्यात आलेला टोलनाका.
----
हातिवले टोलनाका सुरू करण्याच्या हालचाली
यापूर्वीचे दोन प्रयत्न अयशस्वी ; अधिकाऱ्यांकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ ः सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागीय अधिकाऱ्यांनी टोलनाका सुरू करण्याच्यादृष्टीने तालुक्यातील हातिवले येथे पाहणी केली आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये हातिवले येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर पुन्हा टोलवसुलीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी दोनवेळा प्रशासनाने टोलवसुली करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तालुकावासियांनी आंदोलन छेडत टोलवसुली थांबवली होती.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे तालुक्यातील काम जवळपास पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांवर टोलआकारणी करण्यात येणार आहे. याकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या राजापूर तालुक्याच्या हद्दीत हातिवले येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. अडीच वर्षापूर्वी टोलनाक्याचे काम पूर्ण झाले असून, त्या वेळी टोलवसुलीचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले होते.
यापूर्वी जून २०२२ पासून या टोलनाक्यावर टोलवसुलीला सुरुवात होणार होती; मात्र सर्वच राजकीय पक्षांनी टोलवसुलीला विरोध दर्शवला. त्यामुळे टोलवसुली सुरू झाली नव्हती. त्यानंतरही दोनवेळा टोलवसुली सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; मात्र राजापूरवासियांनी टोलनाक्यावर आंदोलन करत विरोध केला होता. त्यानंतर अडीच वर्षे टोलवसुली करण्यात आलेली नव्हती.
सद्यःस्थितीत महामार्गाचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पुन्हा एकदा टोलवसुली करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी टोलनाक्याची पाहणी केली. त्यामुळे महिनाभरात हातिवले येथील टोलनाका सुरू होण्याची शक्यता आहे.
-----
प्रलंबित कामांमुळे विरोध
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी अद्यापही शहरामध्ये एसटी डेपोसमोरील उड्डाणपुलावरील रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही तसेच अद्यापही काही ठिकाणी दिवाबत्ती, प्रवासी निवाराशेड, संरक्षक भिंती, सेवारस्ता, संरक्षक कठडे, वृक्षलागवड अशी कामे प्रलंबित आहेत. याशिवाय चौपदरीकरणात नद्या, वहाळ, पायवाटा, शेती अशा ठिकाणी टाकलेली माती, भराव अद्यापही हटवण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात ये-जा करण्याच्या वाटा बंद झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित कामे पूर्ण झाल्याशिवाय टोलवसुली करू नये, अशी तालुकावासियांची मागणी आहे. त्यामुळे पुन्हा टोलवसुलीला सुरुवात झाल्यास टोलविरोधी आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.