लाईव्ह न्यूज

फोटोसंक्षिप्त-आमदार केसरकरांकडून पारकर कुटुंबियांचे सांत्वन

फोटोसंक्षिप्त-आमदार केसरकरांकडून पारकर कुटुंबियांचे सांत्वन
Published on: 

swt299.jpg
66992
कणकवली ः आमदार दीपक केसरकर यांनी पारकर कुटुंबियांचे सांत्वन केले.

आमदार केसरकरांकडून
पारकर कुटुंबियांचे सांत्वन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ः शिवसेनेचे नेते, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी ठाकरे शिवसेना नेते संदेश पारकर यांची भेट घेतली. संदेश पारकर यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. आमदार केसरकर यांनी पारकर यांना भेटून त्यांचे सांत्वन केले. त्यांच्यासोबत शिवसेना उपनेते संजय आंग्रे उपस्थित होते. यावेळी पारकर यांनी जिल्ह्यात वैद्यकीय सेवा चांगल्या मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती आमदार केसरकर यांच्याकडे केली.
................
झोळंबेत रविवारी
आरोग्य चिकित्सा
बांदा, ता. २९ः सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडी व शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळ झोळंबे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १) निःशुल्क रोग निदान व चिकित्सा तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर सकाळी ८ ते दुपारी १२.३० पर्यंत झोळंबे येथील व्यायाम शाळेत होणार आहे. या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ. शंकर सावंत, फिजिशियन डॉ. चेतन परब, डॉ. स्वप्नील परब, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. विशाल पाटील, डॉ. स्वाती पाटील आदी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत. या शिबिरात ब्लड शुगरची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. सर्व तपासण्यांसह औषधे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी दिलीप घोगळे, मुन्ना गवस, राजेश गवस यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com