लोककलांमधूनच मिळतात अभिनय क्षेत्राला धडे

लोककलांमधूनच मिळतात अभिनय क्षेत्राला धडे

Published on

- rat३०p७.jpg -
५N६७१२०
रत्नागिरी : ज्येष्ठ लोककलावंत जयराम गावडे यांचा सत्कार करताना सतीश दळी. सोबत ओंकार भोजने आणि अन्य मान्यवर.
---
लोककलांमधून मिळतात अभिनयाचे धडे
ओंकार भोजने ः कोकणचा साजचा ५२५ पूर्ती प्रयोग, लोककलावंतांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : नमन, जाकडी या लोककला केवळ कोकणातच आढळतात, कोकणची लोककला अशीच गुगलवरही त्यांची वेगळी ओळख आहे. अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच थिएटर, म्युझिक, स्टोरी टेलिंग याचे धडे लोकनाट्य किंवा लोककलांमधूनच मिळतात. या लोककला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपलं आयुष्य घालवलं आहे. या लोककला जपण्यासाठी व नव्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, अशी भावना कोकणचे सुपुत्र प्रसिद्ध अभिनेते ओंकार भोजने यांनी व्यक्त केली.
येथील सावरकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कोकणातील लोककलावंतांना सन्मानित करण्यात आले. कोकणातील विविध लोककलांचे सादरीकरण करून त्यांची पारंपरिकता जपणाऱ्या आणि त्यातून विविध सामाजिक उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याचा ५२५ पूर्ती निमित्त विशेष प्रयोग नुकताच रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात पार पडला. संगमेश्वरी बोली जपायला हवी, सांगत आज ही बोली जगभर लोकप्रिय होत आहे, त्यामुळे या बोलीचे एक संमेलन घ्यायला हरकत नाही, अशी कल्पना या लोकनाट्याचे मूळ उद्गाते आनंद ब्रोंद्रे यांनी मांडली.
कार्यक्रमाला अभिनेते प्रभाकर मोरे, संजय बोरकर, नेपथ्य-प्रकाश योजनाकार सुनील देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. समर्थ कृपा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या लोकनाट्याला मुसळधार पावसातही रसिकांची झालेली तुडुंब गर्दी हेच या लोकनाट्याचे यश असल्याची कौतुकाची थाप मान्यवरांनी दिली. यावेळी ''कोकणचा साज...''ला नेहमी सहकार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचा फुलझाड देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सतीश शेवडे, बाबू म्हाप, सौरभ मुलुष्टे, सतीश दळी, सनातन रेडीज, डॉ. शेखर निमकर, जयू पाखरे, भाग्येश खरे आदी मान्यवर उपस्थित होते. याचे सूत्रसंचालन दिप्ती कानविंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी यंग ०८ ग्रुप आणि ऑफबिट कॅमेरा टीमचे सहकार्य लाभले.
---
यांचा झाला सन्मान
कोकणची लोककला जपण्यासाठी आयुष्य वेचलेल्या जिल्ह्यातील चंद्रकांत रामचंद्र घवाळी (पानवल-घवाळीवाडी), जयराम पांडुरंग गावडे (पांगरी, ता. संगमेश्वर), अनिल किसन जाधव (नारदखेरकी, ता. चिपळूण), संतोष गंगाराम मोरे (रानपाट, ता. रत्नागिरी), शांताराम रत्नू होरंबे (पानवल-होरंबेवाडी) या प्रातिनिधिक लोककलावंतांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com