जयगड खाडीवर उभारणार ''केबलस्टेड'' पूल
जयगड खाडीवर होणार ‘केबलस्टेड’ पूल
सागरी महामार्गाच्या सौदर्यात भर ; प्रशासकीय मान्यता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३०ः महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समुद्री महामार्गादरम्यान ७१५ कोटींचा भव्य केबलस्टेड पूल उभारण्यात येणार आहे. गुहागर तालुक्यातील तवसाळ ते रत्नागिरी तालुक्यातील जयगड ते समुद्री अंतर पार करणे, या पुलामुळे सहजशक्य होणार आहे. तसेच मुंबईतील वरळी सिलींकप्रमाणे या जयगड खाडीवरील केबलस्टेड पुलामुळे येथील समुद्री महामार्गाच्या सौदर्यात भर पडणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रेवस ते रेड्डी असा ४९८ किलोमीटर लांबीचा समुद्री महामार्गाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या समुद्री महामार्गामुळे रायगडच्या किनारपट्टीचा भाग तसेच पुढे रत्नागिरी तालुक्यातील काही महत्वाच्या खाड्या आणि पुढे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रेड्डी गाव अशा या सागरी महामार्गासाठी ७ हजार ८५१ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या सागरी महामार्गावर रेवस, धरमतर, कुंडलिका, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड आणि कुणकेश्वर असे ७ पूल उभारण्यात येणार आहेत. यापैकी रत्नागिरी तालुक्यातील जयगड खाडीवर ७१५ कोटींची केबलस्टेड पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाची लांबी २०९ किलोमीटर इतकी असून रुंदी १८ मीटर असणार आहे. दोनपदरी वाहतूक असणाऱ्या या पुलावर पर्यटकांसाठी दोन्ही बाजूला पादचारी रस्त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या पादचारी रस्त्यावरुन पर्यटकांना जयगड खाडीचे मनोहारी दृश्य न्याहाळता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.