रत्नागिरी-जिल्ह्यात आढळले १२६ मौखिक कर्करोगाचे रुग्ण

रत्नागिरी-जिल्ह्यात आढळले १२६ मौखिक कर्करोगाचे रुग्ण

Published on

जागतिक तंबाखू विरोधी दिन...लोगो

जिल्ह्यात आढळले १२६ मौखिक कर्करोगाचे रुग्ण
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम; २३ हजार ४०४ लोकांची मौखिक आरोग्य तपासणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : जिल्हा शासकिय रुग्णालयाने आठ वर्षांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून १२ हजार ७२८ लोकांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सोडविण्यासाठी समुपदेशन केले. ३७५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करून २३ हजार ४०४ लोकांची मौखिक आरोग्य तपासणी केली. जिल्हा, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय येथे ओपीडी अथवा आरोग्य शिबिरांमधून ८९६ मौखिक कर्करोगाची प्राथमिक लक्षणे व त्यातून १२६ मौखिक कर्करोगाचे रुग्ण आढळून आले. या सर्व रुग्णांची कर्करोग तज्ञांद्वारे तपासणी करून उपचार केले आहेत.
तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था उपक्रम राबविणे आणि कोटपा कायदा २००३ श्री प्रभावीपणे अंमलबजावणी करुन त्या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी अन्वये १ हजार ७८९ लोकांवर २ लाख ०९ हजार ३८० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभागाने २०१६-१७ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य स्तरावरुन ३४ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जागतिक तंबाखू नकार दिवस ३१ मे २०२५ ला जगभरात साजरा करण्यात येत आहे. यावेळी जागतिक तंबाखू नकार दिवसाची थीम आहे, ''आकर्षणाचा मुखवटा उतरवूया तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांमागील उद्योगांच्या क्लुप्त्या उघड करुया'', अशी आहे. ज्याचा उद्देश तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांच्या जाहिरातीत वापरले जाणारे मोहक मुखवटे उतरवणे आणि लोकांना उद्योगांची फसवणूक करणारी धोरण उघडपणे समजावून सांगणे असा आहे.

कोट
रत्नागिरी हा धूरमुक्त गाव/शहर/जिल्हा करण्याकरिता तालुकास्तरीय व गावस्तरीय अभियान राबविण्यात येत आहे. परंतू यासाठी नागरिकांनी देखील पुढाकार घेऊन तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम ओळखून व्यसनांपासून लांब राहिले पाहिजे. तोंडात कर्करोगजन्य काही लक्षण आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांकडून तपासणी केली पाहिजे. जिल्हा ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या समुपदेशन केंद्र १८००१२३५६ या टोल फ्री क्रमांकाचा लाभ घेतला पाहिजे.
- डॉ. भास्कर जगताप, जिल्हा शल्यचिकीत्सक, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com