लोकसेवा आयोगाची दोन केंद्रावर परीक्षा

लोकसेवा आयोगाची दोन केंद्रावर परीक्षा

Published on

लोकसेवा आयोगाची
दोन केंद्रावर परीक्षा
रत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट –क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (ता. १ जून) रत्नागिरी तालुक्यातील दोन उपकेंद्रावर एक सत्रामध्ये सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण ८२५ उमेदवार बसणार आहेत. परीक्षेची बैठक व्यवस्था अशीः पटवर्धन हायस्कूल- क्र.RT००१००१ ते RT ००१३६०, फाटक हायस्कूल- RT००२००१ ते RT००२४६५. आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा/गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितावर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे.
----------------------
सोळजाई मंदिरतर्फे
गुणवंतांचा गौरव
साडवली : देवरूखची ग्रामदेवी श्री सोळजाई मंदिरतर्फे देवरुख परिसरातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होणार आहे. २ जूनला दुपारी ३.३० वाजता आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यासाठी दहावी परीक्षेत ८० टक्के व त्यावरील गुण मिळवणारे विद्यार्थी, तसेच बारावीत ७० टक्के व त्याहून अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचा गौरव होणार आहे. यासाठी गुणपत्रिकेची झेराक्स प्रत कांगणे गुरुजी, संतोष लाड, ए. टी. भुवड यांच्याकडे आणून द्यावी, असे आवाहन सोळजाई देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
-----------------------
गोकुळ माहेरवाशीणींचा
आज हिरक महोत्सव
साडवली : मातृमंदिर देवरुख येथील गोकुळ माहेरवाशीणींचा हिरकमहोत्सवी मेळावा शनिवारी (ता. ३१) सकाळी ९.३० वाजता होणार आहे. दोन दिवस हा मेळावा असणार आहे. मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री उदय सांमत, डॉ. प्रदीप ढवळ, विजय सराटे, रवींद्र पोरवकर आदी उपस्थित राहणार आहेत. इंदिरा उर्फ मावशी हळबे यांनी १९६४ रोजी अनाथ मुला-मुलींना आधार देण्यासाठी गोकुळ बालिकाश्रम सुरू केला. ६० वर्षात शेकडो अनाथ मुलामुलींना गोकूळने घडवले. याच मुली माहेरवाशीण म्हणून आपल्या परिवारासह दोन दिवस देवरुख गोकूळ येथे येणार आहेत. त्यांचा साडी चोळी देवून सन्मान केला जाणार आहे. आपले अनुभव त्या कथन करणार आहेत. या सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्षा मेघना चाळके, कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, कार्यवाह विनय पानवलकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com