

67286
आमदार नीलेश राणे ‘दशावतारांचे कैवारी’
कलाकारांकडून उपाधी; बिबवणेत संघटनेतर्फे बैठक
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३१ ः अनेक वर्षे लढा देऊन नेहमी अपयशाशी झुंज देणाऱ्या दशावतार कलाकारांची यशाच्या मार्गाकडे वाटचाल करून देणारे आमदार नीलेश राणे यांना ‘दशावतारांचा कैवारी’ ही उपाधी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
श्री गिरोबा देवस्थान बिबवणे येथे पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ, सिंधुदुर्ग यांची सभा शुक्रवारी (ता. ३०) झाली. या सभेला सिंधुदुर्ग कार्यकारिणीतील सदस्य तथा प्रत्येक तालुक्यातील तालुकाध्यक्ष तसेच प्रतिनिधी असे एकूण ३० जण उपस्थित होते. दशावतार कलाकारांची यशाच्या मार्गाकडे वाटचाल करून देणाऱ्या आमदार राणे यांचा यावेळी ‘दशावतारांचा कैवारी’ ही उपाधी देऊन गौरव केला. आमदार राणे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार व संस्कृतिक मंत्रालय अधिकाऱ्यांशी दशावतार कलाकार संघाची सभा घडवून दशावतार कलाकार नोंदणी तसेच अंगावरील पोशाख व अनेक समस्यांबाबत वाचा फोडल्याबद्दल तसेच मंत्री शेलार, सांस्कृतिक मंत्रालय अधिकारी, दशावतार कलाकार यांच्या पाठीशी असणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, दादा साईल, देवेन सामंत, दत्तप्रसाद धुरी (मुंबई) या सर्वांना पेटाऱ्यातील गणपती बाप्पा उदंड आयुष्य देवो, असे म्हणत ऋण व्यक्त केले.
मंत्री शेलार यांच्या आदेशानुसार दशावतार शिफारस समितीवर या संघांचे दोन कलाकार सदस्य तसेच सिंधुदुर्गातील सर्व दशावतार कलाकारांची नाव नोंदणी व कलाकारांच्या पोशाखासाठी मिळणाऱ्या अनुदानासाठी अ, ब, क, ड, या वर्गानुसार कलाकार नोंदणीसाठी नियोजन बैठक झाली. आपल्या प्रत्येक तालुका संघाच्या अध्यक्षाकडे नाव नोंदणी करून न्याय हक्काचा पाया मजबूत करावा, असे आवाहन सिंधुदुर्ग दशावतार कलाकार संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर यांनी केले. सर्व कलाकारांनी एकजुटीने एकत्र यावे, असे आवाहन करत संघातील उपस्थित कार्यकारिणी सदस्य तसेच प्रत्येक तालुकाध्यक्ष व प्रतिनिधी तसेच बिबवणे गावचे ग्रामस्थ आबा राऊळ यांचे त्यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.