सावंतवाडीतील सांडपाण्याचे व्यवस्थापन न केल्यास मोर्चा

सावंतवाडीतील सांडपाण्याचे 
व्यवस्थापन न केल्यास मोर्चा
Published on

सावंतवाडीतील सांडपाण्याचे
व्यवस्थापन न केल्यास मोर्चा

संजू परब ः नगरपालिकेला इशारा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः शहरातील मोती तलावाच्या सौंदर्याला सांडपाण्याच्या समस्येमुळे धोका निर्माण झाल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. मोती तलावाशेजारील काही नवीन इमारतींचे सांडपाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे न झाल्याने ते थेट तलावात मिसळत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या गंभीर प्रश्नाकडे नगरपरिषदेने लक्ष न दिल्यास मोती तलाव वाचवण्यासाठी आक्रोश मोर्चा काढू, असा इशारा परब यांनी दिला.
श्री. परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोती तलाव हे सावंतवाडी शहराचे सौंदर्य आहे. मात्र, अयोग्य सांडपाणी व्यवस्थापनामुळे त्या बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेने शहरातील इमारतींना बांधकाम परवानगी देताना सांडपाणी व्यवस्थापन करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार किंवा बांधकाम करणाऱ्या व्यक्तींवर देणे आवश्यक होते; मात्र याचे पालन झालेले दिसत नाही. मोती तलावाच्या जवळपास नव्याने उभारलेल्या काही इमारतींचे सांडपाणी व्यवस्थापन झालेले नाही. त्यामुळे हे पाणी थेट मोती तलावात येत आहे. ही बाब मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असून, यावर तातडीने सर्वेक्षण करून योग्य खबरदारी घ्यावी आणि मोती तलाव वाचवावा, अशी मागणी केली आहे. याबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास नागरिक आक्रोश मोर्चा काढतील, असा इशारा परब यांनी दिला. यामुळे बंटी पुरोहित, विनोद सावंत, प्रसन्न शिरोडकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com