चिपळूण आगारातील भंगार सहा वर्ष पडून
rat३१p८.jpg ः
२५N६७२९६
चिपळूण आजारातील भंगार.
चिपळूण आगारात भंगार पडून
निविदा प्रक्रिया रखडली ; एसटीच्या तिजोरीत पडेल भर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ : येथील मध्यवर्ती बसस्थानकाची जुनी इमारत तोडून नवीन ‘हायटेक’ बसस्थानक बांधण्यात येत आहे. त्यामुळे जीर्ण इमारत तोडतेवेळी जमा झालेले मोठ्या प्रमाणातील भंगार आगाराच्या आवारात ठेवण्यात आले आहे. सहा वर्षे उलटूनही त्याची निविदा प्रक्रिया न झाल्यामुळे भंगाराचा प्रश्न दुर्लक्षित आहे. विशेष म्हणजे या भंगाराची विक्री झाल्यास त्यातून एसटी महामंडळाच्या तिजोरीत भर पडणार आहे.
जीर्ण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाची इमारत तोडून त्या जागी नव्याने सोयीसुविधांयुक्त बसस्थानक बांधण्यास काही वर्षांपूर्वी सुरुवात झाली. बसस्थानकाची इमारात तोडतेवेळी त्यात लोखंडी छप्परासह पिलर व इतर अनेक लोखंडी भंगार जमा करण्यात आले होते. भारी वजनाचे असलेले हे भंगार जेसीबीच्या सहाय्याने उचलून आगाराच्या मोकळ्या जागेत ठेवण्यात आले होते. सद्यःस्थितीत नव्या हायटेक बसस्थानक इमारतीचा पाया पूर्णत्वास गेला असून, पिलरसह पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे कामही पूर्ण झाले आहे. त्यासाठी जवळपास सहा वर्षांचा कालवधी लागला आहे. असे असताना इतकी वर्षे होऊनही जुन्या इमारतीचे भंगार आहे त्याच ठिकाणी असून कित्येक वर्षात निविदा प्रक्रिया राबवलेली नाही. यामुळेच हा भंगार प्रश्न आजपर्यंत दुर्लक्षित राहिला आहे.
हे भंगार स्थानिक आगार प्रशासनाने विभागस्तरावर जमा केल्यानंतर त्याची एकत्रितरित्या निवादा प्रकिया राबवून खरेदी केली जाते. त्यासाठी स्थानिक आगार प्रशासनाने हे भंगार रत्नागिरीत जमा करणे अपेक्षित असल्याचे अजब उत्तर आगार प्रशासनाकडून दिले जात आहे; मात्र मोठ्या प्रमाणात असलेले भंगार रत्नागिरी येथे ने-आण करण्यासाठी वाहतुकीचा खर्च अधिक येईल. त्याऐवजी आहे त्या ठिकाणी या भंगाराची निविदा प्रक्रिया राबवणे गरजेचे आहे.
........
कोट
चिपळूण आगारात जमा झालेले भंगार विभागस्तरावर जमा केले जाणार आहे. त्यानंतर त्याची लिलाव प्रक्रिया होईल. आम्ही स्थानिक पातळीवर लिलाव प्रक्रिया करू शकत नाही. याबाबत विभाग स्तरावर कळवण्यात आले आहे.
- दीपक चव्हाण, आगारप्रमुख चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.