चिपळूण साठी 16000 पुस्तकांची मागणी
चिपळूणसाठी १६ हजार पुस्तकांची मागणी
समग्र शिक्षा अभियान; मराठीप्रमाणे उर्दू माध्यमाचाही समावेश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांसाठी चिपळुणातील शिक्षण विभागाने १६ हजार पुस्तकांची शासनाकडे मागणी केली आहे. त्यात मराठीप्रमाणे उर्दू माध्यमाचाही समावेश आहे. नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्यास अजून काही दिवसाचा अवधी असला तरी मे अखेरीस किंवा जूनच्या प्रारंभी ही पुस्तके शिक्षण विभागात दाखल होणार आहेत.
पहिली ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना राबवण्यात येते. अजूनही नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी असला तरी चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून मोफत पाठ्यपुस्तकाची शासनाकडून मागणी करण्यात आली आहे. ही पाठ्यपुस्तके मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या प्रारंभीस शिक्षण विभागाकडे प्राप्त होणार आहेत. त्यानंतर त्याचे प्रत्येक शाळास्तरावर वाटप केले जाणार आहे. नवे शैक्षणिक सत्र होण्याच्या पहिल्याच दिवशी ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात मिळावी, या दृष्टीने शिक्षण विभागाचे आतापासून नियोजन सुरू आहे. त्यानुसार शाळांसह विद्यार्थ्यांच्या याद्या अद्ययावत करण्यासाठीच्या कामाला शिक्षण विभाग लागला आहे. दरम्यान, यंदा नव्या शैक्षणिक सत्रामध्ये पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल झाला आहे. अनेक वर्षानंतर हा बदल झालेला असून, त्यात सीबीएसई पॅटर्न अवलंबण्यात आला आहे.
.......
मोफत पाठ्यपुस्तकांची आकडेवारी ः
मराठी माध्यमामध्ये पहिली ते तिसरीसाठी १ हजार ७२४, चौथी १ हजार ८१३, पाचवीसाठी २ हजार २४९, सहावी २ हजार ५, सातवी २ हजार १२९, आठवी २ हजार ३१८ तर उर्दू माध्यमामध्ये पहिली ते तिसरी ८७, चौथी १२१, पाचवी १२५, सहावी ११५, सातवी १११ तर आठवीसाठी १२२ अशा १६ हजार ५४१ मोफत पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.