विकास हवाच पण निसर्गाला विरोध करून नाही...
rat5p11.jpg-
67467
प्रशांत परांजपे
वसा वसुंधरा रक्षणाचा.........लोगो
इंट्रो
जनमानसाच्या मनावर प्रतिबिंबित केले जाते की विकास पाहिजे असेल तर झाडे कापलीच पाहिजेत. विकास करणारे तथाकथित अधिकारी वर्गही बेलगामपणे जीभ आहे म्हणून अधिकार वाणीने काहीही बोलतात. एका तहसिल कार्यालयामध्ये ‘वृक्षकटाई’ या विषयावरील सभेमध्ये एका नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी महोदयांनी उधळलेली मुक्ताफळे जाणीवेने आपल्या माहिती करिता नोंदवत आहे. हे महोदय रस्तारुंदीकरण प्रसंगी वृक्षतोड या विषयावर भाष्य करित होते. ते म्हणतात, ‘‘इंग्रजांनी लावलेली झाडे कवटाळू नका कापून टाका त्यांना कवटाळण्यापेक्षा नवीन झाडे लावा ते महाशय, लावूया, जगवूया, करुया, झाडे वाचवूया असे सांगत नव्हते. मात्र त्यांना आपल्या विधानाचा खूप आनंद झालेला वाटला. अशा मनोवृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळेच आज महाराष्ट्र भकास होवू लागला आहे. भविष्यामध्ये आपण वृक्षसंवर्धनाकडे आपल्या मुला-बाळांप्रमाणे नाही पाहिले तर आपल्या पंतवंड नातवंडाना सावली विकतही मिळणार नाही. वारंवार ऋतुचक्रावर मानवाने केलेल्या अत्याचाराचे फळ मिळते आहे. महाराष्ट्र कधी पाणी-पाणी करित रहातो तर कधी पाणीच पाणी झाले म्हणून घाबरून जातो. पण तरीही आम्ही जागे होत नाही.’’
- प्रशांत परांजपे, दापोली
-----
विकास हवाच पण निसर्गाला विरोध करून नाही...
मुंबई मायानगरी ही कोकणात गणली जाते परंतु, कोकणातील कोणतीही जाणीव या मायानगरीमध्ये अंशतः ही दिसून येत नाही. कारण तेथे विकास दृतगती मार्गावरून आणि हवाई मार्गे येवून धडकतो. चहुबाजूंनी देश विदेशातून नागरिक मायानगरीकडे आकर्षित होत आहेत हा ओघ दिवसेंदिवस वाढतोच आहे. म्हणजे काय होत आहे विकास? पण त्यामागून भकासाची गंगा प्रचंड वेगाने मुंबईला विळखा घालते आहे. मनुष्याने जंगलावर अतिक्रमण करून डोंगराच्या पायथ्यापर्यंत घरे बांधली गर्दी करून वसाहती उभ्या केल्या आणि यामुळे निसर्गचक्र दुभंगले आणि जंगलातील छोटे व मध्यम गटातील पशु-प्राणी खाद्यान्न नसल्याने स्थलांतरीत किंवा गतप्राण झाले. या प्राण्यांची पुढची पिढी खंडीत झाली पर्यायाने यांच्यावर उपजिवीका करणारे हिंस्त्र प्राणी खाद्यान्नाच्या शोधात घराघरात घुसू लागले आणि आपण ओरड करू लागलो. बिबट्या शहरात घुसला ! बिबट्या शहरात घुसला नाही तर आपणच जंगलतोड करून जंगलात घुसलो त्याचेच फळ आपल्याला मिळत आहे. सर्वच महानगरांची मुंबई सारखी स्थिती झाली आहे. आता तर कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या नादात डोंगरदऱ्यापासून सर्वत्र सात आठ मजली इमारतींचे जाळे उभे राहताना दिसते आहे. आणि हे होताना निसर्गाचा समतोल राहील असे कोणतेही पाऊल उचलेले दिसून येत नाही.
यामुळेच जंगली श्वापदे भक्षाच्या शोधात आता मुंबईच्या उपनगरांसह रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड-दापोली, गुहागर,राजापूर, लांजा या सारख्या छोट्या शहरांमध्येही कोणाच्या गोठ्यात तर कोणाच्या ओसरीवर तर कधी उपासमारीमुळे प्रत्यक्षात मानवावरही हल्ले करु लागला आहे.
बिबट्या दिसल्यावर मानवी राक्षसाचे जथ्थे त्याच्या मागे काठ्या, भाले, दगड घेवून धावू लागतात बंदुकीच्या फैरी झाडतात. उपासमारीने चवताळलेला बिबट्या अधिक चेकाळतो बिथरतो प्रसंगी प्रचंड घाबरतो आणि फासकी किंवा खड्डयात पडून आपले प्राणही गमवतो. वारंवार वर्तमानपत्रातून या विषयी बातम्या झळकलेल्या वाचनात येतात. पण या बातम्यांचे मागे जावून ग्रामस्थ वाचक वनाधिकारी, पोलीस किंवा संपूर्ण प्रशासन समाजही विचार करित नाही.
विकास म्हणजे इमारतींचे बांधकाम व बक्कळ पैसा असा गैरसमज करून घेतल्याने दिसेल ती झाडे तोडून इमारतींचे बांधकाम होते. एका दीर्घकालीन वृक्षांची पूर्ण वाढ होण्याकरिता किमान पंधरा वर्ष वाट पहावी लागते. या निसर्गनियमाला आपण आधीन रहातो का? स्वतः प्रतिवर्षी काही झाडे लावतो का? वृक्षतोड ज्या प्रमाणात होते त्याच्या फक्त दहा टक्के लागवड होते.
ग्रामीण भागामध्ये जळवणाकरिता वृक्षतोड होते असे सांगून गरीबांच्या इंधनामुळे भकासपणा येतो असे भासवले जाते पण यामध्ये सत्यता नाही. कारण ग्रामीण भागामध्ये घरगुती इंधन म्हणून लागणारे लाकूड ८० टक्के इतके असले तरी ते कवळ किंवा फांद्या तोडून जमवले जाते. या कवळतोडणीमुळे जंगली वृक्ष पावसाळ्यामध्ये दुप्पट वेगाने फोफावलेले दिसतात.
ग्रामीण भागातून एका जिल्ह्याच्या आकडेवारीवरून प्रतिदिन नोंदणीकृत सुमारे दिडशे गाड्या लाकूड (इमारती) जिल्ह्याबाहेर विक्री करिता जाते. कोकणातील जंगलतोड थांबविण्याकरिता एक उपाय अपणासमोर येतो. प्रत्येक लाकुडतोड्याला तालुकाबंदी केली गेली तर तालुक्यातून जर लाकूड वहातूकीला तालुक्याबाहेर पाठविण्यास रोखल्यास जंगलकटाई कमी होण्यास पहिले पाऊल ठरेल. कारण एका तालुक्याची लाकडाची मागणी तेवढी निश्चित नाही. जेवढा माल रोज तालुक्याबाहेर जात आहे. एवढा बदल जरी झाला. तरीही कोकणासह महाराष्ट्रातील सर्वत्र हिरवाई वनराईचे संवर्धन करणे सहज शक्य आहे. गरज आहे विचार बदलण्याची आणि बदलण्याची.
( लेखक जल, वन आणि कचरा व्यवस्थापन कार्यात अग्रेसर आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.