आधुनिक कृषी तंत्रज्ञान लाभदायक

आधुनिक कृषी तंत्रज्ञान लाभदायक
Published on

67501

आधुनिक कृषी तंत्रज्ञान लाभदायक

रेश्मा तुळसकर ः वेर्लेत शेतकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणाच्या या युगात कृषी क्षेत्रही मागे राहिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या नवनवीन कृषी योजना, पीक उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यांच्या मार्केटिंगसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाशी संपर्कात राहून माहिती घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृषी सहायक रेश्मा तुळसकर यांनी केले.
सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले-फौजदारवाडी येथे जनसेवा प्रतिष्ठान आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना श्रीम. तुळसकर यांनी, पारंपरिक भातशेतीपलीकडे कोकणातील शेतकऱ्यांनी बांबू, फळबाग लागवड तसेच हळद लागवडीकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी लाडजी राऊळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. व्यासपीठावर माजी सरपंच चंद्रकांत राऊळ, माजी उपसरपंच शशिकांत घाडी, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत आणि बादेकार मित्रमंडळाचे अध्यक्ष ज्ञानदेव लिंगवत यांची उपस्थिती होती.
या मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना कृषी सहायक रेश्मा तुळसकर यांनी समाधानकारक उत्तरे दिली. तसेच भात शेतीच्या लागवडीबाबत प्रात्यक्षिक दाखवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी जनसेवा प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सी. लिंगवत, ज्येष्ठ नागरिक द्वारका लिंगवत, राजन घाडी, वसंत मोरजकर, पी. डी. जी. राऊळ, श्रीधर राऊळ, पांडुरंग राऊळ, विश्राम लिंगवत, झिलू राऊळ, महेश राऊळ, यशवंत घाडी, भानू सावंत, रामकृष्ण राऊळ, काशिराम गावडे, शंकरानंद राऊळ, रत्नमाला राऊळ, अश्विनी गोसावी, अशोक गोसावी, विजय गोसावी, विष्णुदास लिंगवत, मधुमती लिंगवत, संगीता लिंगवत, सोमनाथ राऊळ, सुनील राऊळ, आनंद राऊळ, शरद सावंत, संदीप राऊळ आदी शेतकरी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत विष्णुदास लिंगवत यांनी, प्रास्ताविक डॉ. लिंगवत यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. सई लिंगवत यांनी केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com