कसालमध्ये आजपासून
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

कसालमध्ये आजपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Published on

कसालमध्ये आजपासून
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
कुडाळ ः कसाल येथील विद्यानिकेतन स्कूल या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना पाचवी, आठवी स्कॉलरशिप, प्रज्ञा, प्रावीण्य, सातवी ते आठवी इंटरमिजिएट, एलिमेंटरी ड्रॉईंग, सहावी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक या स्पर्धा परीक्षांचे मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरिता २ ते १० जून दरम्यान सकाळी ९ ते ११.३० या वेळेत तज्ज्ञांद्वारे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी सुषमा केणी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
....................
आंदुर्लेत शेतकऱ्यांना
भात बियाणे वाटप
कुडाळ ः शेतकऱ्यांचा पेरणी हंगाम काही दिवसांतच सुरू होणार आहे. त्यामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांना पेरणीसाठी वेळेत भातबियाणे मिळावे, यासाठी आंदुर्ले ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून पाच किलोप्रमाणे हव्या असलेल्या जातीच्या भातबियाण्यांचे मोफत वाटप केले. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
.....................
चौकुळमध्ये म्हशीचा
बंधाऱ्यात पडून मृत्यू
आंबोली ः चौकुळ आडये आष्टावाडी येथे विठ्ठल नारायण गावडे यांची सुमारे ४० हजार रुपये किंमतीची दुभती म्हैस पाणलोटच्या बंधाऱ्यात पडून मृत्यूमुखी पडली. ही घटना शुक्रवारी (ता. ३०) घडली. गतवर्षीही दोन दुभत्या म्हशींवर वीज पडून त्या जखमी झाल्या होत्या. त्याची नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला अद्याप मिळाली नाही. चौकुळ आडये आष्टावाडी चौकुळपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे जंगलमय भागातून जावे लागते. तेथे तीन ते चारच घरे आहेत. या जंगलमय भागात राहून ग्रामस्थ शेतीसोबत उदरनिर्वाहासाठी म्हशी पाळतात.
.....................
बीएसएनएल सेवेचे
श्रावणमध्ये तीनतेरा
मसुरे ः श्रावण परिसरात बीएसएनएल नेटवर्कची रेंज गायब झाल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. मोबाईल ग्राहक रेंजच्या प्रतीक्षेत आहेत. फोन लागत नसल्याने ग्राहकांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे पालकमंत्री नीतेश राणे यांनी लक्ष घालावे व श्रावणवासीयांचा रेंजचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे. श्रावण-तळेवाडी येथे दूरसंचारचा मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे; मात्र तो कार्यान्वित कधी होणार? असा प्रश्न नागरिक व मोबाईल ग्राहकांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com