किरण मेस्त्री ठरली ''चार्मिंग मिस इंडिया''

किरण मेस्त्री ठरली 
''चार्मिंग मिस इंडिया''
Published on

67568

किरण मेस्त्री ठरली
‘चार्मिंग मिस इंडिया’

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १ ः गुर्मीत गरहा ग्रूमिंग स्कूल नवी मुंबईतर्फे जुईनगर येथे घेण्यात आलेल्या ‘मिस, मिसेस आणि मिस्टर इंडिया’ या मानाच्या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले गावची सुकन्या किरण मेस्त्री हिने ‘चार्मिंग मिस इंडिया २०२५’ हा किताब पटकावला. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नवी मुंबई येथे झालेल्या स्पर्धेदरम्यान किरण हिने आपल्या पर्यटन दृष्ट्या बदलत्या वेंगुर्लेची खास अशी ओळख करून दिली. या स्पर्धेमध्ये मिस इंडिया स्पर्धेसाठी एकूण आठ स्पर्धक सहभागी झाले होते. यामधून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांनी किरण मेस्त्री ‘मिस इंडिया’ किताबाची मानकरी ठरली. या स्पर्धेचे परीक्षण ख्यातनाम परीक्षक अमर सोनवणे, सुंदर अलेक्झेंडर, सूरज कुमार, स्वीकृती श्रीवास्तव, फरहान रमझान यांनी केले. स्नेहा सिंग यांनी आपल्या खास शैलीत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. किरण मेस्त्री हिचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com