

खेडमध्ये जोखीमग्रस्त गावांत
२४ तास वैद्यकीय पथके
खेड : तालुक्यात आपत्ती काळात नदीकाठच्या २४ गावांमध्ये रोगराई पसरण्याचा संभाव्य धोका आहे. या जोखीमग्रस्त गावांमध्ये खबरदारीच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेश खरटमोल यांनी दिली. पूरस्थिती ओसरल्यानंतर या गावांमध्ये रोगराई पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. स्वतंत्र नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली असून पूरपरिस्थितीदरम्यन उद्भवणाऱ्या समस्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी कक्षामार्फत पुरेपूर मदत केली जाणार आहे. पूरस्थितीत नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यापासून होणारा संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून मेडिक्लोअरसारख्या पाणीशुद्ध करणाऱ्या औषधांचे वितरणही करण्यात येणार आहे. यासाठी अतिरिक्त साठा करण्यात आला आहे. आरोग्यसेविका व आरोग्यसेवक गावनिहाय भेटी देत पूरस्थितीनंतर उद्भवणाऱ्या आजाराविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करणार आहेत. साथीचा फैलाव डोके वर काढणार नाही, या दृष्टीनेही आतापासूनच विशेष उपाययोजना करण्यावर भर देण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी खरटमोल यांनी सांगितले.
महावितरणच्या कोसुंब शाखेतील
कर्मचारी रमेश शिंदे सेवानिवृत्त
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथील महावितरणच्या शाखा कार्यालयातील प्रधान तंत्रज्ञ रमेश भागोजी शिंदे हे सेवानिवृत्ती झाले. यानिमित्ताने सत्कार उपविभाग कार्यालय देवरुख व कोसुंब शाखा कार्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महावितरणमध्ये श्री. शिंदे यांनी २६ वर्षांचा सेवा काळ पूर्ण केला. यावेळी उपविभाग देवरुखचे उपकार्यकारी अभियंता श्री. आळवेकर, सहायक आभियंता श्री. कोकरे, श्री. सोनवणे, संतोष सुर्वे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रधान यंत्रचालक संजय भोसले यांनी केले.
राजापूर नगरवाचनालयातील
ग्रंथ देवघेव जलद गतीने
राजापूर ः येथील नगर वाचनालयाची शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. बदलत्या काळानुसार जलद गतीने ग्रंथालय सेवा देण्यात यावी या उद्देशाने ग्रंथालयातील ग्रंथांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून सभासदांना ग्रंथ देवघेव सुलभ व जलद गतीने व्हावी या करिता ग्रंथ देवघेव सेवा संगणकीकृत करण्याची सुरूवात ज्येष्ठ वाचक सभासद जयंत कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी कार्यवाह जयंत अभ्यंकर, सुहास ओळकर, राजेंद्र रानडे, जयेश हर्डीकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.