माजी नगरसेवक सुजित मोंडे यांचे निधन

माजी नगरसेवक सुजित मोंडे यांचे निधन
Published on

rat1p23.jpg-
67556
सुजीत मोंडे

माजी नगरसेवक सुजित मोंडे यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः शहरातील खडपेवाडी येथील रहिवासी व राजापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक व राजापूर न्यायालयातील पिटिशन रायटर सुजित गजानन उर्फ बंडया मोंडे (५४) यांचे रविवारी सकाळी निधन झाले.
शनिवारी सायंकाळी त्यांना अचानक चक्कर आली व त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूरला खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र मेंदुत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
सुजित हे येथील दिवाणी न्यायालयात पिटिशन रायटर म्हणून अनेक वर्षे काम पाहत होते. न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. एक हरहुन्नरी, मिश्किल, कष्टाळू अशी त्यांची ओळख होती. एक  क्रिकेटपटू म्हणूनही त्यांची ओळख होती. काही काळ त्यांनी राजापूर नगर परिषदेत नगरसेवक म्हणूनही काम पाहिले. त्यांच्यावर रविवारी सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com