वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर लवकरच तोडगा

वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर लवकरच तोडगा

Published on

कंत्राटी वीज कामगारांच्या समस्या सोडवू
राजेंद्र पवार ः पावसाळी अधिवेशनावेळी आंदोलन करू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः वीज कंपनीच्या उन्नतीत कंत्राटी कामगारांचा मोठा वाटा असून, कंत्राटदारांकडून त्यांना होणाऱ्या अन्यायातून मुक्त करण्यासाठी महावितरणकडून ठोस पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे संचालक राजेंद्र पवार यांनी दिले.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पुण्यातील विश्वकर्मा भवन येथे पार पडली. या बैठकीला राज्यभरातील 28 जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र व गोवा प्रभारी मा. सि. वि. राजेशही उपस्थित होते. संघाचे प्रदेशाध्यक्ष नीलेश खरात म्हणाले, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट 2024 मध्ये 42 हजार कंत्राटी वीज कामगारांसाठी जाहीर केलेले लाभ अजून प्रत्यक्ष अंमलात आलेले नाहीत. प्रशासनाने अद्याप त्या निर्णयांची अंमलबजावणी न केल्यामुळे शेवटच्या कामगारापर्यंत लाभ पोहोचलेले नाहीत. प्रशासन दोषी कंत्राटदारांना पाठीशी घालत आहे. या प्रसंगी संघाचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले की, जर कामगारांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही तर येत्या 30 जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावेळी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल.
भारतीय मजदूर संघाच्या 70व्या वर्धापनदिनानिमित्त ‘कंत्राटी कामगार संदेशयात्रा’ देशभरात राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत विविध क्षेत्रांतील कंत्राटी कामगारांशी थेट संपर्क साधून मेळावे व संवादसत्र आयोजित करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. वीज, जलसंपदा, आरोग्य, परिवहन, बांधकाम यासारख्या क्षेत्रांतील कामगारांमध्ये संघटनात्मक बळकटी आणि हक्कांविषयी जागृती हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असेल. या बैठकीचा समारोप करताना कंत्राटी कामगार, शोषणमुक्त कामगार या करिता संघर्ष करण्याचे आवाहन भारतीय मजदूर संघ क्षेत्रीय संगठन सचिव सी. व्ही. राजेश यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केला आहे. कोषाध्यक्ष सागर पवार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com