बने स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार
बने स्कूलमध्ये
विद्यार्थ्यांचा सत्कार
संगमेश्वर ः माजी आमदार डॉ. सुभाष बने यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. १) साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल येथे दहावीच्या परीक्षेत संगमेश्वर तालुक्यात प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी तसेच बने इंटरनॅशनल स्कूलमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात इला आंबेकर, तनिष्का झगडे, सृष्टी कदम तसेच संगमेश्वर तालुक्यातील सोहम टिळेकर (ठाकरे हायस्कूल), त्रिशा आग्रे ( ठाकरे विद्यालय), आर्या पडये ( माखजन), हर्षवर्धन पाटील (देवरूख), वेदिका शिवगण, आर्यन तांबट (माखजन) आदी विद्यार्थ्यांसह त्याचप्रमाणे कॅरम क्वीन आकांक्षा कदम हिचा विशेष गौरव करण्यात आला. या वेळी माजी आमदार सुभाष बने म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासाच्या जोरावर यश संपादन करून आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत आहेत. हे पाहून खूप आनंद होत आहे. असेच यश मिळवा. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. त्यानंतर आंगवली येथील आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम करण्यात आला.
शिवराज्याभिषेक दिन
६ ला आयटीआयमध्ये
संगमेश्वर ः शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर येथे ६ जून रोजी सकाळी १० वाजता शिवराज्याभिषेक दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये एकाचवेळी करण्यात येणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे संगमेश्वर आयटीआयचे प्राचार्य रवींद्र कोकरे यांनी केले आहे.
देव रामेश्वर मंदिरात
अहिल्यादेवींची जयंती
साडवली ः राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त श्री देव रामेश्वर पंचायतन मंदिर कळंबस्ते साटलेवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ऑपरेशन सिंदूर यांच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली साटलेवाडी समाजसेवा मंडळ व महिला समन्वय संगमेश्वर तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. या रॅलीला स्थानिक कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रीनिवास पेंडसे, निबंध कानिटकर, राजन कापडी यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची आठवण करून दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.