कृषी क्षेत्रातील अधोगती चिंतेची बाब

कृषी क्षेत्रातील अधोगती चिंतेची बाब

Published on

-rat२p३.jpg-
२५N६७६१८
मंडणगड ः पेरणी करताना शेतकरी.
-rat२p४.jpg ः
P२५N६७६१९
पाऊस पडल्यानंतर नांगरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे.

(ग्राफीक पद्धतीने घ्यावे.)
---
कृषी क्षेत्रातील अधोगती चिंतेची बाब
मंडणगड तालुक्यातील चित्र ; लागवड क्षेत्र वाढवण्याचे यंत्रणेसमोर आव्हान, समस्या कृत्रिम
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २ ः तालुक्यात खरीप हंगामातील शेतीसाठी शेतकऱ्यांची शेतांतील मशागतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. पारंपरिक पद्धतीनेच अजूनही शेती करण्याचा शेतकऱ्यांचा कल असला तरी शेतामध्ये मशागत करण्याचा येथील शेतकऱ्यांचा उत्साह विलक्षण असतो. तालुक्यात शेतीतील मुख्य पीक भातपीक असले तरी नाचणी, वरी ही पिके खरीप हंगामात घेतली जातात. कृषी व शेतीपूरक व्यवसायावरच मंडणगड तालुक्याचे अर्थकारण आजही उभे आहे; मात्र मागील ६ ते ७ वर्षांपासून विविध कारणांनी तालुक्यात लागवडीखालील क्षेत्रामध्ये निम्म्याहून अधिक प्रमाणात झालेली कमालीची घट ही चिंतेची बाब ठरते आहे.
तालुक्यात पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ५९४७.४५ हेक्टर आहे; मात्र हे प्रमाण कालांतराने कमी कमी होत गेले. २०२३-२४ मध्ये २६५१ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली होते. यंदाच्या हंगामात ते २७०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे म्हणजेच निम्म्याहून अधिक प्रमाणात लागवडीखालील क्षेत्रात घट झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना कालावधीत लागवडीखालील क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र होते. बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल, विविध कृषी क्रांती झाल्या असल्या तरी तालुक्याची कृषिविषयक परिस्थिती अगदीच विरोधाभासाची आहे. तालुक्यातील कृषी क्षेत्रातील अधोगती हा फार चिंतेचा विषय ठरतो. तसा तो जिल्ह्यातील अन्य तालुक्यांसाठी लागू आहे. असे असले तरी तालुक्याच्या नजीक असलेल्या दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून एकूणच कोकणातील कृषी क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करण्याबाबत फार मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थव्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी कृषी विकासाची आवश्यकता आहे, असे म्हटले जाते. एक प्रगतशील शेती आर्थिक वाढीचे किंवा विकासाचे एक शक्तिशाली यंत्र म्हणून कार्य करते. यामुळे कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. कृषीक्षेत्राचे महत्त्व व या क्षेत्रातील विकसित झालेले तंत्र व कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साह्याने आणि नवीन संकरित बी-बियाणांच्या संशोधनामुळे कृषी उत्पादनात आमुलाग्र सकारात्मक बदल हे पटवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी कृषी शिबिरांचे आयोजन करणेही तितकेच गरजेचे.
---
घटीबाबत कारणमीमांसा आवश्यक
विविध कारणांनी येथील कृषिक्षेत्रात लागवडीखालील क्षेत्रात होणारी घट अर्थात शेतकऱ्यांनी शेतीकडे फिरवलेली पाठ याची कारणमीमांसा झाली पाहिजे. व्यवसायाभिमुख शेती नसणे हे एक प्रमुख कारण शेतकऱ्यांना शेतीपासून दुरापास्त करते. शेतातील उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध नसणे. त्यामुळे उत्पादनाला हमीभाव न मिळणे. यामुळे खऱ्या अर्थाने फार मोठ्या प्रमाणात येथील शेतकरी शेतीपासून दूर जाऊन महानगरात उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झाला. त्यास येथील कृषी उत्पन्न बाजारसमित्या केवळ नावापुरत्या राहिल्या असल्याचेही काहीअंशी कारण असू शकते. जंगली श्वापदांचा उपद्रव ही अलीकडील शेतीसाठीची मोठी समस्या शेती न करण्याचे कारण बनली आहे; पण त्यावर उपाययोजनांसाठी कोणत्याच आघाडीवर ठोस कृती होताना दिसत नाही.
---
खाडीकिऱ्यावरील शेती धोक्यात
खाडी व समुद्रकिनारी असणाऱ्या गावांतील शेतात वाढणारे कांदळवन व खारे पाणी शेतात घुसून किनारी भागातील शेती मोठ्या प्रमाणात नापीक बनते. शेकडो एकरची जमीन नापीक बनत चालली आहे, ही बाब गंभीर आहे. तालुक्यात किमान चार हजार मिमी पाऊस पडत असल्याने निसर्ग आपले काम चोख बजावत असताना पूर्वीप्रमाणे शेती न होण्याची कारणे ही कृत्रिमच आहेत. पाण्याची उपलब्धता असून देखील खरीप व रब्बी या दोन्ही मोसमात शेती करणे हे अजूनही जमलेले नाही. भाजीपाला, फळभाज्या आजही अन्य ठिकाणाहून येथे विक्रीला येतात. बळीराजाला आर्थिक सुबत्तेत सक्षम बनवण्यासाठी कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल करत शेतीकडे पुन्हा वळवण्याचे उत्तरदायित्व हे कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांना पुढील काळात पार पाडावे लागेल.
----
कोट १
शेतीविषयक मार्गदर्शन, शंभर टक्के अनुदानावर बियाणे, भातपीक स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. यावर्षी रब्बी हंगामात भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ झाली. कृषी लागवड क्षेत्र वाढण्याच्यादृष्टीने कृषी विभाग प्रयत्नशील आहे.
- सोमनाथ अहिरकर, तालुका कृषी अधिकारी.

कोट २
निसर्ग संपन्न तालुक्यात कृषी क्रांती होणे अपेक्षित होते. मात्र त्याऐवजी कृषीचे क्षेत्रच कमी होत आहे. पारंपरिक शेतीतून वर्षाअखेर पदरी पडणारे उत्पन्न हे असून नसल्यासारखे आहे. घटते पशुधन व स्थलांतरामुळे मनुष्यबळाची वानवा आहे. गट व सामूहिक शेती करून धरणांच्या पाण्यावर दुबार पिकांचा पर्याय अंमलात आणणे अनिवार्य असून उत्पादित केलेल्या कृषी मालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास तालुक्याची कृषी वाटचाल सुजलाम्‌ सुफलाम होईल.
- कौस्तुभ जोशी, कृषी अभ्यासक

कोट ३
ऐंशी-नव्वद च्या दशकात तालुक्यात शेतीचा सुवर्णकाळ होता. डोंगर माथ्यावर नाचणीचे पीक डोलायचे. घरोघरी बैलजोडीचे नांगर होते. बदलत्या काळात शेती परवडेनाशी झाली आणि गावे स्थलांतरित झाली. उत्पादित होणाऱ्या कृषी मालाला विक्रीच्या व्यवहाराची दिशा न मिळाल्याने दृष्टिकोन बदलला. परिणामी हमखास उत्पन्न देणारी जमीन पडीक झाली. कृषीतून आर्थिक सुबत्ता आणण्याचा तत्कालीन लोकप्रतिनिधींचा दृष्टिकोन कमी पडत आहे.
- समीर पारधी, शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com